शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायमूर्ती समाजात मिसळणारा हवा, त्यामुळे सामाजिक प्रश्नांचे न्यायदानाद्वारे निराकरण करता येते: सरन्यायाधीश भूषण गवई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:38 IST

समता, बंधुता व सामाजिक न्यायाची जपणूक केल्याने हा बहुमान; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी छत्रपती संभाजीनगरात सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या भावना

छत्रपती संभाजीनगर: एक चांगला न्यायाधीश हा वकिलांशी मैत्री ठेवूनही निःपक्षपाती राहू शकतो. जो न्यायाधीश असा राहू शकत नाही, तो न्यायाधीशच नसतो. न्यायमूर्ती समाजात मिसळणारा हवा, त्यामुळे त्याला समाजातील प्रश्न, समस्यांचे आकलन होते व त्यांचे न्यायदानाद्वारे निराकरण करता येते, असे ठाम मत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी येथे गुरुवारी रात्री व्यक्त केले.

औरंगाबाद खंडपीठ संघातर्फे एमजीएमच्या वकील रुख्मिणी सभागृहात आयोजित सत्कारप्रसंगी ते बोलत होते. घटनेचे निर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज व माझे वडील रामचंद्र गवई यांच्या विचारांचा वारसा समता, बंधुता व सामाजिक न्याय यांची जपणूक करीत वाटचाल करण्याचा सातत्याने प्रयत्न केल्यानेच देशाच्या सर्वाेच्च न्यायाधीशपदाचा बहुमान मिळाला. हे सतीचे वाण असून, ते निष्ठापूर्वक पालन करण्याचा प्रयत्न मी कसोशीने करतो, अशा भावना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केल्या. 

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. सूर्यकांत, न्या. दीपांकर दत्ता, न्या. प्रसन्ना वराळे, न्या. ए.एस. चांदूरकर, तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रवींद्र घुगे, न्या. नितीन सांबरे, न्या. विभा कंकणवाडी, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष विठ्ठल बी. कोंडे देशमुख आदींची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई आणि सुविद्य पत्नी डाॅ. तेजस्विनी गवई, मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे, खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अविनाश बोरूलकर व सचिव ॲड. रवींद्र गोरे यांचीही विशेष उपस्थिती हाेती.

सर्वोच्च न्यायालय सर्व न्यायमूर्तींचे‘सर्वोच्च न्यायालय हे फक्त सरन्यायाधीशांचे नसून, ते सर्व न्यायमूर्तींचेच असते. त्यामुळे निर्णय हा एकमतानेच व्हायला हवा. एकट्याने काम करता येत नाही. एक चांगला न्यायाधीश हा वकिलांशी मैत्री ठेवूनही निःपक्षपाती राहू शकतो. जो न्यायाधीश असा राहू शकत नाही, तो न्यायाधीशच नसतो, असे ठाम मत त्यांनी मांडले. न्यायमूर्ती समाजात मिसळणारा हवा, त्यामुळे त्याला समाजातील प्रश्न, समस्यांचे आकलन हाेते व त्यांचे न्यायदानाद्वारे निराकरण करता येते.

‘लोकमत’चा लेख आणि फोन...या सत्कारानिमित्त निवृत्त न्या. पुखराज बोरा यांनी ‘लोकमत’मध्ये लिहिलेल्या लेखाचा उल्लेख करून सरन्यायाधीश गवई म्हणाले की, ‘मी हा लेख वाचला. लेख वाचून त्यांना फोन करून लेख चांगला झाल्याचे सांगितले. त्यांनी या लेखाबद्दल दोनदा आपल्या भाषणात उल्लेख केला. अनेक न्यायमूर्ती चांगले निकालपत्र लिहितात; पण त्यांचे कुणी अभिनंदन करीत नाही; परंतु नाशिक येथे प्रधान न्यायाधीश असताना न्या. बोरा यांनी दिलेल्या चांगल्या निकालपत्राबद्दल मी फोन करून त्यांचे अभिनंदन केले होते, तसे आजही केले’, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

कोल्हापूरसाठी मी नेहमी पाठिंबा दिला‘कोल्हापूरसाठी स्वतंत्र सर्किट खंडपीठ असावे, ही मागणी जेव्हा जेव्हा झाली, तेव्हा मी तिला पूर्ण पाठिंबा दिला आहे. त्यासाठी मी औरंगाबाद खंडपीठाचे उदाहरण नेहमी देतो. जेव्हा औरंगाबाद खंडपीठ सुरू झाले. त्यावेळी त्याच्या उपयुक्ततेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले; परंतु आज येथे दरवर्षी जेवढे खटले दाखल होतात, ते मुंबई उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यांपेक्षा अधिक आहेत’, असे गवई यांनी नमूद केले.

न्यायाधीश निवडीत गुणवत्ता महत्त्वाचीगवई कोलेजियमबाबत म्हणाले की, ‘आम्ही नेहमीच गुणवत्तेवर आधारित न्यायाधीशांची निवड करण्यावर भर दिला आहे. उमेदवाराची जात, धर्म किंवा सामाजिक पार्श्वभूमी, हे कधीही निकष ठरत नाहीत. केवळ त्यांची पात्रता, ज्ञान व नीतिमत्ता हेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.’

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय