शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी मामाकडे आलेल्या अल्पवयीन मैत्रिणीवर मित्राचा अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 17:47 IST

पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या तरुणास जेरबंद केले आहे

वाळूज महानगर : नीट परीक्षेची तयारी करत असलेल्या अल्पवयीन मुलीवर तिच्या मित्राने अनेकदा अत्याचार केल्याची खळबळजनक घटना वाळूज उद्योगनगरीत उघडकीस आली. याप्रकरणी १७ वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी चव्हाण (२२) विरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडिता प्राची (नाव बदलले आहे) ही काही दिवसांपूर्वी नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी उद्योगनगरीत मामाच्या घरी आली होती. एका महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेऊन ती खाजगी क्लासेसमध्ये नीटची तयारी करीत होती. परिसरात राहणाऱ्या करण चव्हाण या तरुणासोबत तिची ओळख झाली. सतत भेटीगाठीतून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.

तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर करणने चार महिन्यांपूर्वी २२ मे रोजी सायंकाळी तिला भेटायला बोलावून अत्याचार केला. २ ऑगस्टला ती क्लासेसला जात असताना तिला मोकळ्या जागेत नेऊन पुन्हा अत्याचार केला होता. १६ ऑगस्टला करणने तिला भेटण्यासाठी बोलावून पुन्हा अत्याचार केला. तो सतत अत्याचार करीत असल्यामुळे घाबरलेल्या प्राचीने ही बाब मामा व कुटुंबीयांना सांगितली.

अत्याचारी मित्र जेरबंदप्राचीने दिलेल्या माहितीने कुटुंब हादरून गेले. कुटुंबीयांनी तिला धीर देत एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात नेले. पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी आरोपी करण चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून बुधवारी परिसरातून त्याला जेरबंद केले. उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे या पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादsexual harassmentलैंगिक छळ