शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गॅस कटरने एटीएम फोडताना लागली आग; साडेतेरा लाख रुपये जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 11:18 IST

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील घटना; चोरट्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

दौलताबाद (छत्रपती संभाजीनगर) : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील माळीवाडा येथील नाशिक मार्गावर असलेले भारतीय स्टेट बॅंकेचे एटीएम चोरटे गॅस कटरद्वारे फोडताना लागलेल्या आगीत १३ लाख ६१ हजार ८०० रुपयांची रक्कम जळून खाक झाली आहे. ही घटना सोमवारी पहाटे ४:१५ वाजेच्या सुमारास घडली.

माळीवाडा येथील नाशिक मार्गावर भारतीय स्टेट बॅंकेची शाखा आहे. या शाखेच्या बाजूलाच एटीएम व सीडीएम मशिन आहे. सोमवारी पहाटे ४:१५ वाजेच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये तीन ते चार अज्ञात चोरटे आले. त्यांनी त्यांची कार बँकेसमोर उभी करून तोंडाला कपडा बांधलेल्या दोन व्यक्तींनी एटीएममध्ये प्रवेश करून शटर बंद केले. त्यानंतर त्यातील एका व्यक्तीने एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरा तोडला व सोबत आणलेल्या गॅस कटरच्या साह्याने एटीएम मशिन कापणे सुरू केले. मशिनचा समोरचा भाग कापला गेला; पण आतील भाग तसाच असल्याने त्यात गॅस कटरची ठिणगी पडली. त्यामुळे एटीएममधील १३ लाख ६१ हजार ८०० रुपयांची रक्कम जळू लागली. ही बाब एटीएम केंद्राच्यावरील मजल्यावर राहणारे रहिवाशी हिवाळे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ बॅंकेचे शाखा प्रबंधक सोमनाथ सोळंके व पोलिसांना माहिती दिली. तसेच, आजूबाजूच्या व्यक्तींना फोन केले. काही वेळात तेथील सायरन वाजायला सुरुवात झाली. त्यामुळे बँकेच्या आसपास राहणारे काही ग्रामस्थ घराबाहेर निघाले. ही बाब चोरट्यांच्या लक्षात येताच त्यांनी गॅस कटर मशिन व अन्य साहित्य तेथेच टाकून पळ काढला.

पोलिसांनी केला पंचनामायाबाबत माहिती मिळाल्यानंतर दौलताबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जनार्दन साळुंखे, सहायक पोलिस निरीक्षक संजय गीते, रफीक पठाण, खुशाल पाटील, सुदर्शन राजपूत हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा केला. त्यानंतर ठसे तज्ज्ञ व श्वास पथकास पाचारण करण्यात आले. तोपर्यंत बॅंकेचे शाखा व्यवस्थापक सोळंके दाखल झाले. दरम्यानच्या काळात उपस्थितांनी आग विझवली. तोपर्यंत एटीएम मशिनमधील सर्व नोटा जळून खाक झाल्या होत्या. याप्रकरणी बॅंकेचे शाखा व्यवस्थापक सोमनाथ सोळंके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वसंत शेळके हे करीत आहेत.

डिजिटल कॅमेऱ्यात घटना चित्रीतचोरट्यांनी एटीएम केंद्रात प्रवेश केल्यानंतर तेथील सीसीटीव्ही कॅमेरा तोडला ताे बंद हाेता. त्याच्या बाजूला दुसरा डिजिटल कॅमेरा होता. त्या कॅमेऱ्यात ही घटना चित्रीत झाली आहे. पोलिस तपासासाठी ही बाब महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे.

टॅग्स :atmएटीएमCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद