शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नवरी मिळेना शेतकरी नवऱ्याला, शेती पाहिजे पण शेत कसणारा नवरा नको

By प्रशांत तेलवाडकर | Updated: December 4, 2023 19:00 IST

शेतकरी नवरा नको गं बाई; पस्तिशीतही नवरी मिळेना !

छत्रपती संभाजीनगर : तुळशीचे लग्न लागले आणि लग्नसराईला धूमधडाक्यात सुरुवात झाली. पण, या धामधुमीपासून अनेक नवरदेव वंचित आहेत. कारण, त्यांची वयाची पस्तिशी ओलांडली, पण अजून त्यांना वधू मिळेना. त्यात शेतकरी तरुणांचे तर हाल विचारूच नका. कोट्यवधीची शेतजमीन आहे, पण तरुणी लग्न करायला तयार नाहीत. कारण, शेती पाहिजे पण शेतकरी नवरा नको गं बाई, असे वधू व तिच्या आई-वडिलांची भूमिका आहे. यामुळे वय वाढत आहे व लग्नही जुळत नाही.

मुलींपेक्षा मुलांच्या लग्नाची चिंता वाढलीमागील दहा वर्षांत तरुणांची संख्या वाढली व तरुणींची संख्या त्यातुलनेत कमी होत आहे. आता काही व्यावसायिक वधू-वर सूचक मंडळात तरुणींची नाव नोंदणी मोफत केली जात आहे. १ हजार तरुणांमागे ९५० तरुणी असल्याने तरुणांच्या लग्नाची चिंता वाढली आहे.

काय कारणे आहेत.१) मुलींच्या अपेक्षा वाढल्या : आयटी क्षेत्रात गलेलठ्ठ पॅकेज मिळू लागल्याने तरुणींचा ओढा आयटी क्षेत्रातील तरुणांशी लग्न करण्याकडे आहे.२) मुंबई-पुणे-बंगलोर : पुणे, मुंबई- बंगलोर- हैदराबाद या महानगरात बड्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. तेथील पगारही लाखोत आहे. त्यातुलनेत मराठवाड्यात कमी पगार मिळतो. यामुळे या महानगरातील तरुणाशी आपल्या मुलीचे लग्न लागावे, अशी मुलीच्या आई व वडिलांची इच्छा आहे.३) समानक्षेत्रातील स्थळ : मुलगी इंजिनिअर, डॉक्टर, आर्किटेक्ट, सीए असेल तर त्यांना त्यांच्याच क्षेत्रातील तरुणाचे स्थळ शक्यतो पाहिले जाते. अपेक्षेपेक्षा कमी स्थळ मिळाले तर तरुणी नकार देतात.

या मुलांच्या लग्नाची चिंताशेतकरी : शेतकरी तरुण असेल तर तरुणी त्याच्याशी लग्न करण्यास तयार होत नाही, कारण शेतातील कामाची कष्ट करण्याची मानसिकता नाही. सततच्या ओल्या व कोरड्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे जीवन अधिक कठीण झाले आहे. शेतकरी तरुण उच्च शिक्षित असला तरी नकारच मिळतो. यामुळे शेतकरी तरुणांचे लग्न रखडत आहे.पुरोहित : पुरोहितांचा व्यवसाय हंगामी मानला जातो. आज अनेक पुरोहितांना मोठी कमाई असली तरी तरुणी पुरोहित तरुणाला नकार देत असल्याने अनेक पुरोहितांचे वय ४५ वर जाऊन ठेपले तरी लग्न होत नाही. कमी शिक्षित : तरुणी अभ्यासात हुशार असतात. हे दरवर्षीच्या निकालावरून सिद्ध असते. तसेच उच्च शिक्षितांमध्ये तरुणींचे प्रमाण जास्त आहे. तरुणींच्या तुलनेत तरुणांचे कमी शिक्षण हासुद्धा ‘लग्न’ जमण्यात अडसर ठरत आहे.कमी पगार : अनेक तरुण सर्वसामान्य नोकरी करतात. त्यांचा पगारही कमी आहे. कमीत कमी ५० हजार रुपयांपेक्षा दरमहा जास्त पगार मिळविणाऱ्या तरुणाचे स्थळ वधूकडील मंडळी शोधत असतात.

‘जुळवून घेणे’ हाच पर्यायउच्च शिक्षित तरुणींना त्यांच्या क्षेत्रातील तरुण असावा असे वाटते. ही अपेक्षा योग्य आहे, पण कमी शिक्षित तरुणींचाही उच्च शिक्षित व मोठ्या पॅकेजच्या तरुणाशीच लग्न करण्याकडे कल असतो. यात काहीच हरकत नाही. पण जर वयाची तिशी ओलांडल्यावर तरुणींनीही आपल्या अपेक्षा कमी करून चांगले स्थळ असले तर ‘जुळवून घेणे’ महत्त्वाचे आहे.-सुधीर नाईक, वधू-वर सुचक मंडळ

टॅग्स :Farmerशेतकरीmarriageलग्नAurangabadऔरंगाबाद