शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चक्क न्यायालयाच्या नावाने बनवली लाखो रुपयांच्या दंडाची बनावट नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 13:30 IST

वेबसाईटवरुन लेटरहेड, न्यायाधीशांच्या सही, शिक्क्यांचा वापर; न्यायालयाच्या नावाने.६२ लाखांचा दंड भरण्याची बनावट नोटीस तयार करून एकास पाठवली

छत्रपती संभाजीनगर : न्यायालयाच्या नावे पाच जणांना १ लाख ६२ हजार दंड भरण्याची बनावट नोटीस पाठवून फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याची बाब उघडकीस आली आहे. न्यायालयाच्या वतीने अधीक्षक विवेक सरोसिया (५७) यांच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

फुलंब्री तालुक्यातील निधोना येथील विठ्ठल आव्हाड (४१) यांना काही दिवसांपूर्वी न्यायालयाकडून दंड भरण्याबाबत नोटीस प्राप्त झाली. नोटीसमध्ये म्हटल्यानुसार, शरद दिलीप नरवडे (२१, रा.निधोना) यांनी न्यायालयात दाखल क्रिमिनल केस क्र. (३४७/२०२४) शरद दिलीप नरवडे विरुद्ध विठ्ठल आव्हाड, कांताबाई आव्हाड, सागर आव्हाड, रुख्मनाबाई सोनवणे, संदीप सोनवणे. त्यावर तृतीय न्यायदंडाधिकारी यांनी कलम ६३ सीआरपी प्रमाणे दंड भरून २५ सप्टेंबरपर्यंत पावती डाक पोस्टाने पाठवावी, असा उल्लेख होता. यात प्रत्येकाच्या नावासमोर दंडाची रकमेचा उल्लेख हाेता. या नोटिसीमुळे घाबरलेल्या विठ्ठल यांनी २३ सप्टेंबर रोजी न्यायालयात वरिष्ठ लिपिक शेख रफिक यांना भेटले. त्यांना प्राप्त नोटीसबाबत विचारणा केली. न्यायालयाच्या वतीने याबाबत चौकशी करण्यात आली असता, नोटीस बनावट असल्याचे समोर आले.

नेमका काय प्रकार घडला?जुलै, २०२४ मध्ये न्यायालयात कर्मचाऱ्यांच्या विविध पदांच्या भरतीबाबत कार्यालयाच्या संकेतस्थळावर नोटीस प्रदर्शित करण्यात आली होती. ही नोटीस मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या सही व शिक्क्याने प्रदर्शित करण्यात आली होती. आरोपींनी त्या नोटीसच्या लेटर हेडमधील मजकुरात बदल करून न्यायालयाची मोहोर, न्यायाधीशांचे पद, सही, शिक्क्याचा वापर करून दंडाचा उल्लेख करत बनावट नोटीसच तयार केली. विठ्ठल यांच्यासह तालेब सत्तार शेख व शोहेल लतिफ शेख यांना ही नोटीस पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. निरीक्षक प्रवीणा यादव यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक वैभव मोरे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी