शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आता हद्द झाली! पैठण हायवेवरील बंद पडलेल्या कंपनीत भरदिवसा चोरी, सुरक्षारक्षकास धमकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 13:55 IST

''तू कुठे राहतो हे माहिती आहे, घरात घुसून मारू'', चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी चौकीदारास दिली धमकी

छत्रपती संभाजीनगर: पैठण महामार्गावरील चितेगाव येथील एका बंद पडलेल्या कंपनीत भरदिवसा चोरीची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. चार ते सहा चोरट्यांनी अवैधरीत्या आज सकाळी ९. ३० वाजता प्रवेश करत लोखंडी जाळी, दरवाजे, खिडक्या आणि इतर मौल्यवान सामानावर लंपास केले. चोरी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौकीदारास चोरट्यांनी चाकू दाखवत धमकावले. ''तू कुठे राहतो हे माहिती आहे, घरात घुसून मारू'', अशी धमकी चौकीदारास देत चोरट्यांनी बिनधास्तपणे सामान लंपास केले. या भागात सातत्याने चोरीचे सत्र सुरू असल्याने कंपनी चालकात दहशतीचे वातावरण आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की. शंकर झुनझुनवाला यांची ओरियन लॅमिनेटस लिमिटेड ही कंपनी पैठण हायवेवर चितेगाव येथे आहे. काही वर्षांपासून कंपनी बंद असल्याने झुनझुनवाला यांनी येथे एक सुरक्षारक्षक नियुक्त केला आहे. कंपनी बंद असली तरी त्यात किंमती सामान आहे. त्यामुळे अनेकदा रात्रीच्या अंधारात कंपनीच्या आवारात घुसून चोरट्यांनी चोरी केली आहे. मात्र, आज सकाळी ९. ३० वाजता चोरट्यांनी हद्द केली, चार ते सहा चोरट्यांनी कंपनीत प्रवेश केला. जाळी, दरवाजे, खिडक्या आणि इतर मौल्यवान सामान चोरटे लंपास करू लागले. यावेळी सुरक्षारक्षकाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चोरट्यांनी चाकू दाखवत, ''तू कुठे राहतो हे माहिती आहे, घरात घुसून मारू'', अशी धमकी दिली. हा सर्व प्रकार सुरक्षारक्षकाने मोबाइलमध्ये शूट केला आहे. त्यानंतर सुरक्षारक्षकाने बीडकिन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

पोलिसांत तक्रार दाखल कंपनीत यापूर्वी रात्रीच्या वेळी अनेकदा चोरी झालेली आहे. मात्र, यावेळी चोरट्यांनी धाडस दाखवत सकाळीच कंपनीत प्रवेश केला. सुरक्षारक्षकास धमकावत चोरट्यांनी लोखंडी जाळी, दरवाजे, खिडक्यासह इतर मौल्यवान सामान लंपास केले. ११२ क्रमांकावर संपर्क केला मात्र, पोलिसांनी स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल करण्याचे सांगितले. त्यानुसार सुरक्षारक्षकाने बीडकिन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच याबाबत सीएमआय यांना निवेदन देत लक्ष देण्याची मागणी केली आहे. - शंकर झुनझुनवाला, एमडी, ओरियन लॅमिनेटस लिमिटेड

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद