छत्रपती संभाजीनगर : पर्यटननगरी छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरुळ आणि अजिंठा यासारखी जागतिक वारसास्थळे आहेत. या दोन स्थळांशिवाय इतरही ऐतिहासिक पर्यटनस्थळे आहेत. रोज हजारो पर्यटक या शहरात येतात. तरीही या शहरात आंतरराष्ट्रीय विमानसेवा का नाही, असा सवाल जर्मनीहून आलेल्या पाहुण्यांनी उपस्थित केला.
‘फॅमल रायझिंग टूर’साठी आलेल्या जर्मन पाहुण्यांनी शनिवारी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भेट दिली. अजिंठा लेणीच्या व्ह्यू पाॅइंटवरून त्यांनी लेणीचे सौंदर्य न्याहाळले. लेणीतील बौद्धकालीन भित्तीचित्रे, गुहा आणि शिल्पकलेचा जवळून अभ्यास केला. अजिंठा लेणीतील कलाकृतींचे वैभव पाहून प्रतिनिधींनी या वारसास्थळाचे कौतुक केले. गाइड डाॅ. सुभाष जाधव, पर्यटन उपसंचालक विजय जाधव, सहायक जिल्हा पर्यटन अधिकारी अजिमोद्दीन शेख, सहायक जिल्हा पर्यटन अधिकारी शोएब शाह, पर्यटन सहायक डॉ. शिवाजी गायकवाड, राेहन कांबळे यांनी पर्यटकांना मार्गदर्शन केले.
या पाहुण्यांनी शहरातील टूर व्यावसायिक, हाॅटेल व्यावसायिक, गाइड असोसिएशन यांच्याशी संवाद साधला. येथील पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्थान आहे. हे स्थान जपायला पाहिजे. त्यासाठी विविध प्रयत्नांची गरज आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाने आंतरराष्ट्रीय स्तरावर निमंत्रित करून आपले जागतिक स्थान दाखवून दिले, असेही प्रतिनिधी म्हणाले. यावेळी हरप्रीत सिंग, जसवंत सिंग, गणेश चप्पलवार आदी उपस्थित होते.
दिल्ली, मुंबईमार्गे येण्याची वेळया शहरात विविध ऐतिहासिक स्थळे असूनही येथे थेट आंतरराष्ट्रीय हवाई कनेक्टिव्हिटी नसल्याची बाब त्यांनी आश्चर्याने मांडली. प्रतिनिधींच्या मते, विविध देशांतील अनेक पर्यटक अजिंठा-वेरूळ लेणी पाहण्यास उत्सुक असतात. मात्र मुंबई, दिल्ली किंवा इतर शहरांमार्गे प्रवास करावा लागत असल्याने वेळ आणि खर्च वाढतो. छत्रपती संभाजीनगरला थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाल्यास परदेशी पर्यटकांसाठी हा परिसर अधिक सुलभ होईल, असे त्यांनी नमूद केले.
इमिग्रेशन चेकपोस्टची प्रतीक्षाचछत्रपती संभाजीनगर विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानसेवेच्या दृष्टीने सोयी-सुविधा सज्ज आहेत. मात्र, या ठिकाणी इमिग्रेशन चेकपोस्टची (आयसीपी) नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे.
Web Summary : German tourists visiting Aurangabad, home to Ajanta and Ellora, questioned the lack of international flights despite its rich heritage and tourist influx. They highlighted the inconvenience and expense of transiting through other cities. The city awaits immigration check post to facilitate international air travel.
Web Summary : अजंता और एलोरा के घर, औरंगाबाद घूमने आए जर्मन पर्यटकों ने समृद्ध विरासत और पर्यटकों की आमद के बावजूद अंतरराष्ट्रीय उड़ानों की कमी पर सवाल उठाया। उन्होंने अन्य शहरों से होकर गुजरने की असुविधा और खर्च पर प्रकाश डाला। शहर अंतरराष्ट्रीय हवाई यात्रा को सुविधाजनक बनाने के लिए आव्रजन जांच चौकी का इंतजार कर रहा है।