शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

रेकी करतानाची कार, मोपेड एकाच वेळी पोहोचल्या हॉटेलमध्ये आणि निष्पन्न झाले दरोडेखोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 14:08 IST

रेकी करून जाताना खरेदीसाठी उतरला होता हाजबे, एकाच दिवसात उचलले पाच जण; ९ अधिकारी, ४० कर्मचाऱ्यांचे ११ दिवस अहोरात्र परिश्रम

छत्रपती संभाजीनगर : उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात दरोडा टाकण्यासाठी रेकी करताना योगेश हाजबेने काही महिन्यांपूर्वी खरेदी केलेली किया कार आणि एक माेपेड सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली. पोलिसांनी याचा शेवटपर्यंत माग काढला असता दोन्ही वाहने एकाच वेळी त्याच्या हॉटेलपर्यंत पोहोचल्या. तेव्हाच रेकॉर्डवरील गुन्हेगार हाजबेचे हॉटेल कळले आणि तेथेच पोलिसांना तपासाचा महत्त्वाचा धागा गवसला. शनिवार व रविवारी अवघ्या २४ तासांत नियोजन आखत पाचही जणांना अटक केली.

पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या सूचनेवरून या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी ९ अधिकारी ४० कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त केले होते. सुरुवातीपासून हा दरोडा माहितगाराच्या माहितीवरून रेकी करून केल्याचा संशय पोलिसांना होता. पोलिसांनी लड्डा यांच्या घरासमोरील दोन कुटुंबांचे डीव्हीआरच ताब्यात घेतले. त्यात मागील महिन्याभराचे फुटेज तपासणे सुरू केले. दुसरीकडे ९ मे पासून योगेश व अमोल खोतकरने लड्डा यांच्या सोसायटीत चकरा मारण्यास सुरूवात केली होती. पोलिसांनी काळ्या रंगाची किया व एक मोपेड दुचाकी संशयास्पदरीत्या आढळून आली. पाेलिसांनी पुढे त्यांचा माग काढणे सुरू केले.

खरेदीसाठी उतरला आणि पकडला गेलारेकी करून जाताना एका फुटेजमध्ये हाजबे बजाजनगरमध्ये एका दुकानावर खरेदीसाठी थांबला होता. पाेलिसांना तेथेच पहिल्यांदा त्याचा चेहरा मिळाला आणि गुन्हेगार निष्पन्न झाला. पुढे पोलिस त्याची किया व मोपेडचा माग काढत गेले. तेव्हा दोन्ही गाड्या त्याच्या हॉटेलवर जाऊन थांबल्याचे आढळले. त्यानंतर पुढे गुन्ह्याची प्रत्येक कडी उकलत गेली.

पहिले हाजबेला पकडलेपोलिसांनी सर्वप्रथम हाजबे व नंतर बिडवेला ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत आंबेजोगाईचे सोहेल व अजहरोद्दीन निष्पन्न झाले. दोन पथकांनी त्यांना घरातून अटक केली.

आंध्रप्रदेश, तामिळनाडूत प्रवासदरोड्यानंतर १६ मे रोजी सकाळी सर्वजण लॉजवर गेले. प्राथमिक माहितीनुसार, अमोल व हाजबेने सर्वांना प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम सोने दिले. त्यानंतर सर्व विखुरले गेले. अमोल मैत्रीण हाफिजा उर्फ खुशी अक्तर अली शेख (२७, मूळ रा. पश्चिम बंगाल) हिच्यासोबत आंध्रप्रदेश, तामिळनाडूत फिरला. एन्काउंटरनंतर त्याच्या कारमध्ये पांघरुण, अंथरुण, दोघांचे कपडे, नशेच्या गोळ्या, कंडोमची पाकिटे मिळून आली.

या अधिकाऱ्यांनी घेतले परिश्रमपोलिस निरीक्षक संदीप गुरमे, सहायक निरीक्षक रवी गच्चे, मनोज शिंदे, विनायक शेळके, काशिनाथ महांडुळे, उपनिरीक्षक विशाल बोडखे, प्रवीण पाथारकर, संदीप सोळुंके, प्रवीण वाघ, संदीप शिंदे यांच्या पथकांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRobberyचोरीWaluj MIDCवाळूज एमआयडीसी