शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात बादली बनली कवच; १६ वर्षीय शेतकरीपुत्राने धाडसाने उलटवला डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 13:11 IST

डोक्यात बादली घालताच बिबट्याने ठोकली धूम

कन्नड : शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या एका बिबट्याच्या शावकाने (अंदाजे वय ६ महिने) एका सोळावर्षीय मुलावर झडप घातली. मात्र, सदर मुलाने प्रसंगावधान राखून बिबट्याच्या डोक्यात हातातील बादली घातल्याने गांगरलेल्या बिबट्याने तेथून धूम ठोकली. ही थरारक घटना कन्नड तालुक्यातील सासेगाव शिवारात शुक्रवारी (दि.२०) सायंकाळी घडली. ओमकार संजय घुगे, असे या धाडसी मुलाचे नाव आहे.

सासेगाव येथील ओमकार घुगे हा मुलगा शुक्रवारी सायंकाळी पाळीव जनावरांना चारापाणी करण्यासाठी शेतात गेला होता. मुरघास काढत असताना तेथे शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या बिबट्याच्या अंदाजे सहा महिने वय असलेल्या शावकाने त्याच्यावर समोरून अचानक हल्ला केला. सुरुवातील घाबरलेल्या ओमकारने नंतर प्रसंगावधान राखत बिबट्याचा विरोध करीत हातात असलेल्या लोखंडी बादलीने त्याच्या डोक्यावर प्रहार केला. यामुळे गांगरलेल्या बिबट्याच्या शावकाने तेथून धूम ठोकली. हा थरार पाच ते सहा मिनिटे सुरू होता. या हल्ल्यात ओमकारच्या छातीवर व अंगावर पंजाचे ओरखडे लागल्याने तो किरकोळ जखमी झाला. सदर बिबट्याचे शावक हे पूर्णपणे वाढ झालेले नव्हते, नसता ओमकारचा जीव धोक्यात आला असता, अशी माहिती ओमकारचे पालक संजय घुगे व ग्रामस्थ राजू बोंगाने यांनी दिली.

वनविभागाचे पथक गस्तीवर या घटनेची माहिती मिळताच आम्ही सासेगाव येथे धाव घेतली. ओमकारच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली, तसेच घडलेला घटनाक्रम जाणून घेतला. सध्या ओमकार सुखरूप असून, वन कर्मचाऱ्यांचे पथक गस्तीवर आहे.-शिवाजी टोंपे, वनपरिक्षेत्र अधिकारी, कन्नड

टॅग्स :leopardबिबट्याchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरFarmerशेतकरीforestजंगल