शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

राखी बांधण्यासाठी पुण्याहून येणाऱ्या बहिणीची वाट पाहणाऱ्या भावाचा कारच्या धडकेत मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 15:16 IST

बहीण चौकात वाट पाहत राहिली; राखी पौर्णिमेला राखी बांधून घेण्याचे स्वप्न राहिले अधुरे

छत्रपती संभाजीनगर : राखी पौर्णिमेनिमित्त पुण्यावरून येणाऱ्या बहिणीची वाट पाहणाऱ्या भावाचा सुसाट कारच्या धडकेत मृत्यू झाला. वैभव सुधाकर कुलकर्णी (वय ५५, रा. उल्कानगरी) असे मृताचे नाव आहे. सोमवारी रात्री १ वाजता बाबा चौकात हा अपघात घडला.

खासगी कंपनीत अभियंता असलेले वैभव यांची बहीण अंजली वाघदरीकर या राखी पौर्णिमेनिमित्त शहरात एसटी बसने येणार होत्या. त्यांना घरी आणण्यासाठी वैभव महावीर चौकात गेले होते. बाबा पेट्रोलपंपाजवळ कोपऱ्यात ते बहिणीची वाट पाहत उभे होते. यावेळी लोखंडी पुलाकडून कारचालक (एमएच २० एफवाय १९८५) सुसाट वेगात आला व थेट एका उभ्या कारवर धडकला. त्या कारमध्ये कोणीही नव्हते. मात्र, ती कार दोन वेळेस फिरून थेट वैभव यांच्यावर जाऊन धडकली. यात ते दूरवर फेकले जाऊन दगडावर आपटून गंभीर जखमी झाले.

बहीण चौकात वाट पाहत राहिली...अंजली चौकात पोहोचण्याच्या काही मिनिटांपूर्वी वैभव यांचा अपघात झाला. स्थानिकांनी धाव घेत रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना घाटीत दाखल केले. अंजली सातत्याने त्यांना कॉल करत होत्या. मात्र, तोपर्यंत भावाचा मृत्यू झाला होता. वैभव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आहेत. ऐन राखी पौर्णिमेलाच बहीण भावांची ताटातूट झाल्याने हळहळ व्यक्त होत होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातRaksha Bandhanरक्षाबंधन