शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

प्रवास्यांना मोठा फटका! औरंगाबादहून मुंबईसाठी सायंकाळची विमानसेवा मार्चअखेर बंद होणार

By संतोष हिरेमठ | Published: February 20, 2023 12:37 PM

प्रवासी, उद्योजक, पर्यटकांना बसणार फटका; विमानसेवा कायम ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची गरज

औरंगाबाद : मुंबईसाठी सायंकाळच्या वेळेत सुरू असलेली इंडिगोची मुंबई- औरंगाबाद-मुंबई विमानसेवा मार्चअखेर बंद होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी पुन्हा एकदा पहाटेच्या विमानसेवेवरच औरंगाबादकरांना अवलंबून राहावे लागेल. याचा उद्याेग, व्यावसायिक, पर्यटकांना मोठा फटका बसेल. त्यामुळे आमदार, खासदारांनी यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.

इंडिगोचे सायंकाळी उड्डाण घेणारे विमान ३१ ऑक्टोबर २०२२ पासून सकाळी झेपावण्यास सुरुवात झाली होती. एअर इंडियाचे मुंबईचे विमानही सकाळीच आहे. त्यामुळे मुंबईला सायंकाळी जाण्यासाठी विमान उपलब्ध नव्हते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. विशेषत: मुंबईहून औरंगाबाद येणाऱ्या प्रवाशांना अगदी पहाटे तीन वाजता उठून सकाळचे विमान गाठावे लागत होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन औरंगाबाद टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीने सायंकाळच्या विमानसेवेसाठी प्रयत्न केले. अखेर १ डिसेंबर २०२२ पासून चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सायंकाळच्या वेळेस मुंबईसाठी इंडिगो कंपनीमार्फत विमानसेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी अशा दोन्ही वेळेत मुंबईसाठी विमान होते; मात्र आता मार्चअखेर सायंकाळचे विमान बंद करण्याच्या हालचाली इंडिगोकडून सुरू आहेत. मुंबई विमानतळावर या सेवेसाठी उन्हाळी वेळापत्रकात स्लॉट मिळत नसल्याचे सांगितले जाते.

पाठपुरावा सुरूउन्हाळी वेळापत्रक अजून आलेले नाही; परंतु मार्चअखेर आणि एप्रिलमध्ये या विमानाची बुकिंग होत नाही. सायंकाळी मुंबईसाठी विमानसेवा असावी, यासाठी एअर इंडिया आणि इतर एअरलाईन्सकडे पाठपुरावा सुरू आहे, असे औरंगाबाद टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटनAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ