नवव्या आंतरमंडलीय क्रीडा स्पर्धा आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 01:06 IST2017-11-28T01:06:45+5:302017-11-28T01:06:52+5:30

महापारेषणतर्फे मंगळवारपासून नवव्या आंतरमंडलीय क्रीडा स्पर्धेस उद्यापासून मिलकॉर्नर येथील जुने पॉवर हाऊस परिसरात प्रारंभ होत आहे.

The 9th Intergovernmental Sports Tournament | नवव्या आंतरमंडलीय क्रीडा स्पर्धा आजपासून

नवव्या आंतरमंडलीय क्रीडा स्पर्धा आजपासून


औरंगाबाद : महापारेषणतर्फे मंगळवारपासून नवव्या आंतरमंडलीय क्रीडा स्पर्धेस उद्यापासून मिलकॉर्नर येथील जुने पॉवर हाऊस परिसरात प्रारंभ होत आहे. ३0 नोव्हेंबरदरम्यान रंगणाºया या स्पर्धेचे उद्घाटन मंगळवारी सकाळी १0 वाजता महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता अविनाश कोंडावार असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, अधीक्षक अभियंता विनय नागदेव असणार आहेत. बक्षीस वितरण ३0 नोव्हेंबर रोजी महापारेषणचे संचालक (संचलन) गणपत मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता अविनाश कोंडावार असणार आहेत. उद्घाटन व समारोप सोहळ्यास क्रीडा रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता शिवशंकर स्वामी, महेंद्र वाळके, शामकांत वसेकर, गोविंद जाधव, अनिल भारसाखळे यांनी केले आहे.

Web Title: The 9th Intergovernmental Sports Tournament