जिल्हा बँकेसाठी ९९.७५ टक्के मतदान

By Admin | Updated: May 6, 2015 00:30 IST2015-05-06T00:24:26+5:302015-05-06T00:30:31+5:30

लातूर : जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या १९ पैकी १३ जणांची बिनविरोध निवड झाली असून, उर्वरित ६ मतदारसंघांसाठी ८ मतदान केंद्रांवर मंगळवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत ९९.७५ टक्के मतदान झाले

99.55 percent voting for District Bank | जिल्हा बँकेसाठी ९९.७५ टक्के मतदान

जिल्हा बँकेसाठी ९९.७५ टक्के मतदान


लातूर : जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या १९ पैकी १३ जणांची बिनविरोध निवड झाली असून, उर्वरित ६ मतदारसंघांसाठी ८ मतदान केंद्रांवर मंगळवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत ९९.७५ टक्के मतदान झाले.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या १९ जागांपैकी १३ जागांची बिनविरोध निवड करण्यात आली. उर्वरित ६ जागांसाठी निवडणूक लागली. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान झाले. बहुतांश मतदारांनी दुपारी २ वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला.
अहमदपूर मतदान केंद्रावरून प्राथमिक कृषी पतपुरवठ्याच्या ६९ मतदारांनी व नागरी बँकेच्या २१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. चाकूरमध्ये प्राथमिक कृषी पुरवठ्याच्या ४१ व नागरी बँकेच्या १० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जळकोट तालुक्यातील प्राथमिक कृषी पुरवठ्याचे ३४ व नागरी बँकेचे ४, शिरूर अनंतपाळ तालुक्यातून प्राथमिक कृषी पतपुरवठ्याचे २६ व नागरी बँकेचे ६, देवणी मतदान केंद्रावरून प्राथमिक कृषी पतपुरवठ्याचे ३१ व नागरी बँकेचे ४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच नागरी सहकारी बँका व पतपुरवठ्याच्या मतदारांपैकी लातूर तालुक्यातून ११४, उदगीरहून २३ व निलंगा मतदारसंघातून २१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नागरी बँक पतसंस्थेच्या २०३ व कृषी पतपुरवठा संस्थेच्या २०१ अशा एकूण ४०४ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. तर पतसंस्थेचा एक मतदार मात्र मतदान प्रक्रियेपासून वंचित राहिला आहे. जिल्हा बँकेच्या मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी ए.एन. घोलकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. गजेंद्र देशमुख, अशोक कदम यांच्यासह दोन क्षेत्रीय अधिकारी, ४० कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय इमारतीतील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात मतदान झाले. (प्रतिनिधी)
जिल्हा बँकेच्या सहा जागांसाठी मंगळवारी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत कृषी पतपुरवठा पतसंस्थेच्या २०१ मतदारांनीही मतदानाचा हक्क बजावला. एकूण १०० टक्के मतदान झाले. तर नागरी बँक पतसंस्थेच्या २०४ मतदारांपैकी २०३ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. तर एक मतदार मतदानापासून वंचित राहिला. यामुळे ९९.५० टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ए.एन. घोलकर यांनी दिली.

Web Title: 99.55 percent voting for District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.