शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

मराठवाड्यात ९ कोटी २८ लक्ष लागवड उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:12 PM

३३ कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमात मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत १ जुलै ते ३० सप्टेंबर कालावधीत सर्वच विभाग मिळून ९ कोटी २८ लाख वृक्ष लावणार आहेत. यंदापासून झाडाच्या लागवडीनंतर जोपासना न करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईपेक्षा कारागृह परिसरात झाडे लावण्याची शिक्षा ठोठावणारा कायदा केला जाणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : झाडे जगविण्याचा कायदाच करणार, अन्यथा जेलची हवा खावी लागणार

औरंगाबाद : ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमात मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत १ जुलै ते ३० सप्टेंबर कालावधीत सर्वच विभाग मिळून ९ कोटी २८ लाख वृक्ष लावणार आहेत. यंदापासून झाडाच्या लागवडीनंतर जोपासना न करणाऱ्यावर दंडात्मक कारवाईपेक्षा कारागृह परिसरात झाडे लावण्याची शिक्षा ठोठावणारा कायदा केला जाणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.मराठवाडास्तरीय महसुली विभागाची आढावा बैठक सोमवारी वाल्मी येथे पार पडली. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. झाडे लावा ही सक्ती न राहता प्रत्येकाने स्वत:हून पुढे यावे आणि झाडे लावून त्यांची जोपासना करण्यावर भर दिला पाहिजे. शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानास वनवृत्त शिवाराची जोड दिली असून ‘वन है तो जल है, जल है तो कल है’ म्हणून पाण्याचे महत्त्व अबाधित आहे. या सर्व प्रकारामुळे वनक्षेत्रातील जलसाठे ४३२ चौरस किमीने विस्तारले आहेत.देशी प्रजातीच्या झाडांची लागवड करण्यावर यंदा वन विभागाने भर दिला आहे. घनदाट अरण्य ही नवीन संकल्पना रुजवली जात आहे. प्रत्येक नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषद यांना कमी जागेत वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे.फळ झाड, बांबू क्षेत्राचे उद्दिष्ट वाढविणे गरजेचे असून, कृषी विभागाला देखील तसे कळविले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या बाजूला वृक्ष लागवडीचे नियोजनातच ठरविलेले आहे. त्यामुळे त्यांनी लक्षपूर्वक झाडांची लागवड करण्यावर भर दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.प्रयोग यशस्वीइको बटालियन, आर्मीच्या वतीने अब्दीमंडी, शेंद्राबन परिसरात झाडे लावली. आता यंदा निरगुडी, रसूलपुरा, शेंद्रा, सुलतानाबाद या क्षेत्रात झाडे लावण्याचे ठरविले आहे. त्यांना लातूर आणि उस्मानाबाद या भागातही वृक्ष लागवडीसाठी जमीन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे.बांबूवर आधारित कौशल्य विकास केंद्रमहाराष्ट्र राज्य बांबू विकास महामंडळ, बांबू प्रशिक्षण व संशोधन संस्था, चिंचपल्ली पुणे, राहुरी, संत गाडगे महाराज विद्यापीठ, अमरावती या ठिकाणी बांबूवर आधारित कौशल्य विकास केंद्र स्थापन केले आहे. विविध उपक्रमांमुळे बांबूचे क्षेत्र वाढले आहे, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर व विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार