नियोजन समितीच्या चार जागांसाठी ९८ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:08 IST2017-08-19T00:08:40+5:302017-08-19T00:08:40+5:30
जिल्हा नियोजन समितीच्या नगरपालिका गटातील चार जागांसाठी शुक्रवारी ९८ टक्के मतदान झाले. शनिवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

नियोजन समितीच्या चार जागांसाठी ९८ टक्के मतदान
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा नियोजन समितीच्या नगरपालिका गटातील चार जागांसाठी शुक्रवारी ९८ टक्के मतदान झाले. शनिवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मतमोजणी होणार आहे.
परभणी जिल्हा नियोजन समितीच्या २४ सदस्यांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. या निवडणुकीत जिल्हा परिषद गटातील २० जागा आणि महानगरपालिका गटातील ४ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. नगरपालिका गटातील ४ जागांसाठी मतदान घ्यावे लागले. ४ जागांसाठी ८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्ग गटातील एका जागेसाठी पूर्णा येथील राकाँच्या नगरसेविका शमीम बेगम शेख चाँद बागवान आणि गंगाखेड येथील भाजपचे नगरसेवक शेख कलीम शेख रहिमोद्दीन, सर्वसाधारण स्त्री गटातून राष्टÑवादी काँग्रेसच्या जिंतूर येथील नगराध्यक्षा सबिया बेगम कपिल फारुकी, काँग्रेसच्या पठाण मैमुनिस्सा फैज खान, पूर्णा येथील राकाँचे नगरसेवक शमीम बेगम मोहम्मद शरीफ आणि मानवत येथील काँग्रेसच्या नगरसेविका शैलजा उमेशराव बारहाते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे सर्वसाधारण जागेसाठी शिवसेनेचे पूर्णा येथील उपनगराध्यक्ष विशाल कदम आणि राकाँचे पाथरी येथील गटनेते जुनेद खान दुर्राणी असे ८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथील तहसील कार्यालयात सकाळी ८ वाजेपासून मतदानास प्रारंभ झाला. एकूण १५४ सदस्यांपैकी १५१ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. ७६ पुरुष आणि ७५ महिला मतदारांनी मदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या निमित्ताने जिल्हाभरातील नगरसेवकांनी परभणीत गर्दी केली होती. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी सकाळी मतमोजणी होणार आहे.