शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

बालकांवरील दृष्कर्माच्या घटनांत ९८ टक्के परिचितच : विजया रहाटकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 16:26 IST

अहवालानुसार ९८ टक्के घटनांमध्ये दुष्कर्म केलेले त्यात बालकांचे परिचित नातेवाईक, शेजाऱ्यांचा समावेश होता.  

औरंगाबाद : बालकांवर झालेल्या अत्याचाराच्या ज्या घटना समोर येतात. अहवालानुसार ९८ टक्के घटनांमध्ये दुष्कर्म केलेले त्यात बालकांचे परिचित नातेवाईक, शेजाऱ्यांचा समावेश होता.  समाजात मानसिक व वैचारिक परिवर्तन घडून येणे महत्त्वाचे आहे व दुसरीकडे कायदा अधिक सक्षम झाल्याने अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षाही होऊ शकते, असा कायद्याचा व सामाजिक धाक निर्माण होईल तेव्हाच बालकांवरील अत्याचार रोखले जातील, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी येथे व्यक्त केले. 

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने ‘पोक्सो’ कायद्यावरील एक दिवस परिषदेत त्या बोलत होत्या. रामा इंटरनॅशनल येथे मंगळवारी सकाळी  कार्यशाळेला सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिषदेचे आॅनलाईन उद्घाटन केले. व्यासपीठावर विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद. गुजरात बालहक्क आयोगाच्या अध्यक्षा लीलाबेन अंकोलिया, हरियाणाच्या अध्यक्षा डेसी ठाकूर, झारखंडच्या कल्याणी शरण, कर्नाटकच्या नागलक्ष्मी व उत्तर प्रदेशच्या अध्यक्षा विमल वाभम यांची प्रमुख उपस्थिती होती. 

प्रारंभी, पुरुषोत्तम भापकर यांनी, महिला व बालकल्याणासाठी मराठवाड्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली.  यानंतर दिवसभर विविध सत्रात तज्ज्ञांनी ‘पोक्सो’वर मार्गदर्शन केले. यावेळी बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, हनींदर कौर (पंजाब),  ममन चतुर्वेदी (राजस्थान), संध्या प्रधान (ओडिशा), जम्मू-काश्मीर सदस्य सचिव डॉ. खलीद, हुसेन मलिक, स्नेहांजली मोहांती (ओडिशा) यांच्यासह पोलीस विभाग, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी हजर होते. सूत्रसंचालन करीत डॉ. मंजूषा मोळवणे यांनी आभार मानले. परिषदेच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व व्यासपीठावर विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, बार कौन्सिलचे अध्यक्ष अतुल कराड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

दोन सत्रांत तज्ज्ञांचे मार्गदर्शन या परिषदेत दोन सत्र झाले त्यात अ‍ॅड. प्रशांत माळी, डॉ. देबरुती हल्दर, प्रो. अशोक वडजे, अर्पण संस्थेच्या अध्यक्षा अभिलाषा रावत यांनी ‘इंटरनेट सायबर लॉ व पोक्सो कायदा’ यावर मार्गदर्शन केले. अ‍ॅड. सेल्विन काळे, बाल हक्क आयोगाचे माजी सचिव ए. एन. त्रिपाठी, डॉ. शैलेश मोहिते यांनी पोक्सो कायद्यासमोरची आव्हाने या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश (गोवा) वंदना तेंडुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘अभय’ नाट्याने परिषदेचा समारोप झाला. सूत्रसंचालन अ‍ॅड. अर्चना गोंधळेकर यांनी, तर अ‍ॅड. आशा दांडगे यांनी आभार मानले.

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाAurangabadऔरंगाबादVijaya Rahatkarविजया रहाटकर