जायकवाडीत ९.६१ % साठा
By Admin | Updated: August 6, 2014 02:37 IST2014-08-06T02:18:05+5:302014-08-06T02:37:44+5:30
पैठण : जायकवाडी धरणात ९.६१ टक्के जलसाठा झाला आहे.

जायकवाडीत ९.६१ % साठा
पैठण : जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागातील धरणातून विसर्ग करण्यात येत असल्याने धरणात ७३८७ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू आहे. सध्या धरणात ९.६१ टक्के जलसाठा झाला आहे.
१५२२ फूट जलक्षमता असलेल्या धरणात आज सायंकाळी १४९८.७१ फूट पाणी पातळी झाली होती. धरणात एकूण जलसाठा ९४६.७१० द.ल.घ.मी. झाला असून यापैकी २०८.६०४ द.ल.घ.मी. उपयुक्त जलसाठा झाला आहे. वरील धरणांपैकी दारणा धरणातून ८४६९ क्युसेक्स, गंगापूर धरणातून २११२ क्युसेक्स विसर्ग करण्यात येत आहे. नांदुर मधमेश्वर प्रकल्पातून सर्वाधिक २२५९० क्युसेक्स विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक आज मध्यरात्रीपासून वाढण्याची शक्यता आहे.