जिल्ह्यातील ९४ प्रकल्प कोरडेठाक..!
By Admin | Updated: July 30, 2015 00:43 IST2015-07-30T00:33:40+5:302015-07-30T00:43:36+5:30
उस्मानाबाद : पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप जिल्ह्यात एकही मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे लघु व मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले असून

जिल्ह्यातील ९४ प्रकल्प कोरडेठाक..!
उस्मानाबाद : पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप जिल्ह्यात एकही मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे लघु व मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले असून, जिल्ह्याच्या अनेक गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत ९४ प्रकल्प करोडेठाक असून १९ प्रकल्पात २५ टक्के पेक्षा कमी तर २११ प्रकल्पांमध्ये केवळ @२.२० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे़
मागील तीन-चार वर्षापासून जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होत आहे़ परिणामी जिल्ह्यात उन्हाळ्याच्या प्रारंभीपासूनच नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ जिल्ह्यात तीन मोठे १७ मध्यम व १९३ लघू प्रकल्प आहेत़ सद्यस्थितीत या प्रकल्पांमध्ये काही दिवसांपुरताच पाणी साठा शिल्लक राहिला आहे. मान्सूनपूर्व व मृगनक्षत्रात पावसाने जिल्ह्यात चांगली हजेरी लावली होती़ त्यामुळे पेरणीच्या तयारीत असलेला बळीराजा सुखावला होता़ मात्र, त्यानंतर पावसाने पाठ फिरविल्याने पाणी संकट उभे ठाकले आहे.
सद्यस्थितीत उस्मानाबाद तालुक्यातील सकनेवाडी, कोंडवाडी, सांगवी, नितळी, उमरगा तालुक्यातील बलसूर, कोराळ, एकुरगा, जेवळी, गुंजोटीवाडी, कळंब तालुक्यातील आडसुळवाडी, पाडोळी, नागुलगांव, बारातेवाडी, येडेश्र्वरी, भूम तालुक्यातील हिंवरडा, तर पंरडा तालुक्यातील निम्नखैैरी हे प्रकल्प कोरडेठाक आहेत. तसेच बहुतांश प्रकल्पात अल्प पाणीसाठा असल्याने शहरी भागासह ग्रामीण भागाला पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत़ १६ लघू प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जिल्ह्यातील २११ प्रकल्पांमध्ये केवळ @२.२० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़ (प्रतिनिधी)