हजार मुलांमागे ९३४ मुली !

By Admin | Updated: November 19, 2014 00:59 IST2014-11-19T00:54:04+5:302014-11-19T00:59:24+5:30

सितम सोनवणे , लातूर मुलांच्या प्रमाणात मुलींची संख्या देशातच घटत आहे़ लातूर जिल्ह्यात हजार मुलांमागे ९३४ मुली असे प्रमाण आहे़ कायद्याचा धाक व जनजागृती करुन

934 girls for thousands of boys! | हजार मुलांमागे ९३४ मुली !

हजार मुलांमागे ९३४ मुली !


सितम सोनवणे , लातूर
मुलांच्या प्रमाणात मुलींची संख्या देशातच घटत आहे़ लातूर जिल्ह्यात हजार मुलांमागे ९३४ मुली असे प्रमाण आहे़ कायद्याचा धाक व जनजागृती करुन जनमानसात म्हणावे तसे मतपरिवर्तन न झाल्याने अद्यापही ६६ मुलींचा फरक कायम आहे़
देशात मुली, मुलांचे प्रमाण हे सुरवातीपासूनच विषम आहे़ मुलींचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी जनमानासतील प्रयत्न महत्वाचे आहेत़ तसेच समाजात पुुरुष प्रधान संस्कृतीत होत असलेला बदल़, शासन स्तरावर केले गेलेले प्रयत्न त्या अंतर्गत लिंगनिदान तपासणीवर घातलेले बंधन हे ही एक महत्वाचे कारण आहे़ या घातलेल्या बंदीमुळे लातूर जिल्ह्यातच नव्हेतर महाराष्ट्रात ही संख्या झपाट्याने वाढली आहे़तरी फरक कायम आहे़ लिंग गुणोत्तर प्रमाणानुसार २०१२ मध्ये जानेवारी ते मे महिन्यात हजार मुलांमागे ९०१ मुलीचे प्रमाण होते़ हेच प्रमाण पुढे २०१३ मध्ये एप्रिल ते मार्च महिन्यामध्ये हजार मुलां मागे ९१२ मुली असे होते़ या वर्षात ११ ने हे प्रमाण वाढले तर पुढे २०१४ मध्ये हजार मुलांच्या मागे ९३४ मुली म्हणजेच ३३ वाढले आहे़ केवळ लातूर तालुक्यात २९९८ मुलांंचे प्रमाण आहे़ तर मुलीचे प्रमाण २९३७ आहे़ हजार मुलांमागे ९८० मुलीचे प्रमाण आहे़ औसा तालुक्यात ८३७ मुलांचे तर ८१३ मुलींचे प्रमाण आहे़ हजर मुलांच्यामागे ९७१ मुली आहेत़ अहमदपूर तालुक्यात ७३० मुले तर ६०३ मुली आहे़ अर्थात हजार मुलांमागे ८२६ मुलींची संख्या आहे़ उदगीर तालुक्यात १३९५ मुले तर १३०९ मुली आहेत़ स्त्री पुरुष गुणोत्तर प्रमाण ९३८ मुली असे आहे़ निलंगा तालुक्यात १२५३ मुल तर १०५२ मुली आहे़ ८४० मुली एकूण प्रमाण आहे़
रेणापूर तालु्क्यात २७५ मुले तर २५७ मुली आहेत़ मुलींचे प्रमाण हे ९३५ असे आहे़ चाकूर तालुक्यात ६०७ मुलांमागे , ५४५ मुली आहेत़ हे सरासरी प्रमाण ८९८ मुली असे आहे़ देवणी तालुक्यात २९९ मुला मागे तर २७५ मुली आहेत़ हजार मुलामागे ९२० मुली आहेत़
शिरुर अनंतपाळ तालुक्यात १४३ मुलामागे तर १४१ मुलीची संख्या आहे़ सरासरी प्रमाण ९८६ आहे़ जळकोट तालुक्यात १४७ मुलामागे तर १२४ मुली असे प्रमाण आहे़ ८४४ मुलीचे प्रमाण आहे़

Web Title: 934 girls for thousands of boys!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.