शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात १२ दिवसांत ९३.२ मिमी पाऊस; विविध घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू

By विकास राऊत | Updated: June 13, 2024 19:26 IST

जायकवाडीत दीड टक्के पाणी वाढले

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात १ जून ते १२ जूनपर्यंत ९३.२ मिमी पाऊस झाला आहे. बुधवारी सकाळपर्यंत ८.३ मिमी पावसाची नोंद झाली. विभागातील मोठ्या प्रकल्पांत सध्या ११.४५ टक्के जलसाठा आहे.

१ जूनपासून आजवर विभागात सुमारे १० टक्के पाऊस वार्षिक सरासरीच्या तुलनेत झाला आहे. विभागाची वार्षिक सरासरी ६७८.८७ मिमी असून मागील वर्षीच्या तुलनेत ५ टक्क्यांनी जास्त पाऊस झाला आहे. १७० मिमी पाऊस प्रत्येक महिन्यात होणे अपेक्षित आहे. जून महिन्यात आजवर ९३.२ मिमी पाऊस झाल्याचे आकडेवारी सांगत आहे. १२ जून रोजी सकाळपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ०.८ मिमी जालना ६.३, बीड ५.२, लातूर १२.९, धाराशिव ३१.१, नांदेड ३.८, परभणी २.५ तर हिंगोली जिल्ह्यात २८.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. विभागातील बीड, छत्रपती संभाजीनगर, लातूर, जालना, धाराशिव जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे, तर नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात कमी पाऊस झालेला आहे. जून महिन्यांत विभागाच्या सरासरीच्या तुलनेत १७० मिमी पाऊस होणे अपेक्षित आहे. जायकवाडी धरणात या आठवड्यात झालेल्या पावसामुळे दीड टक्के पाणी वाढले आहे. जायकवाडीवरील धरणातून अद्याप पाण्याचा विसर्ग नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

१४ जणांचा मृत्यू, ११ जखमीमराठवाड्यात १ ते १२ जूनदरम्यान वीज पडून व इतर दुर्घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात जालना १, नांदेड ३, बीड १, लातूर ४, धाराशिवमध्ये १, परभणीत ३ तर हिंगोलीत १ जणाचा मृत्यू झाला आहे. ११ जण जखमी झाले आहेत. लहान-मोठे मिळून २५१ जनावरांचा मृत्यू झाला आहे, तर २९८ मालमत्तांचे नुकसान झाले आहे. ५४ गोठ्यांचे नुकसान झाले आहे.

कोणत्या प्रकल्पात किती पाणी?जायकवाडी - ५.६५ टक्केनिम्न दुधना - १.६३ टक्केयेलदरी - २६.९७ टक्केसिध्देश्वर - ०० टक्केमाजलगाांव - ०० टक्केमांजरा - ०० टक्केपेनगंगा - २७.६६ टक्केमानार - २२.२२ टक्केनिम्न तरेणा - ६.८५ टक्केविष्णुपुरी - १४.४ टक्केसिना कोळेगाांव - ०० टक्के

एकूण - ११.४५ टक्के

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा