९० वर्षांच्या आजींनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:06 IST2021-03-04T04:06:41+5:302021-03-04T04:06:41+5:30

कडूबाई बाबूराव अंभोरे असे या आजींचे नाव आहे. एन-११ येथे त्या राहतात. विशेष म्हणजे त्यांच्या मुलाचे वय ६५ वर्षे ...

90 year old grandmother took the vaccine | ९० वर्षांच्या आजींनी घेतली लस

९० वर्षांच्या आजींनी घेतली लस

कडूबाई बाबूराव अंभोरे असे या आजींचे नाव आहे. एन-११ येथे त्या राहतात. विशेष म्हणजे त्यांच्या मुलाचे वय ६५ वर्षे आहे. त्यांचे नाव आहे साहेबराव अंभोरे. आईबरोबर त्यांनीही कोरोना लस घेतली. आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी एकच गर्दी झाली. या गर्दीत जेव्हा कडूबाई अंभोरे दाखल झाल्या, तेव्हा आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांचे वय अधिक असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी त्यांना मदतीचा हात देत लसीकरणासाठी मदत केली. आरोग्य केंद्राचे प्रमुख डाॅ. रवी सावरे यांनी स्वत: कडूबाई यांना लस दिली. पहिल्यांदाच आपण इतक्या वयाच्या व्यक्तीस लस दिली असून, हा आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असल्याचे डाॅ. सावरे म्हणाले.

फोटो ओळ..

लस घेतल्यानंतर कडूबाई अंभोरे यांनी असे छायाचित्र काढून घेतले.

Web Title: 90 year old grandmother took the vaccine