ऊसतोड मजुराच्या घरी ९0 हजारांची चोरी

By Admin | Updated: December 31, 2015 13:50 IST2015-12-31T13:43:23+5:302015-12-31T13:50:33+5:30

तीर्थपुरी येथून जवळच असलेल्या रामसगाव येथील ऊसतोड मजूर गणेश केशव पटेकर यांच्या घरात ९० हजार रुपयांची चोरी झाली

90 thousand stolen from the farmhouse | ऊसतोड मजुराच्या घरी ९0 हजारांची चोरी

ऊसतोड मजुराच्या घरी ९0 हजारांची चोरी

 तीर्थपुरी : येथून जवळच असलेल्या रामसगाव येथील ऊसतोड मजूर गणेश केशव पटेकर यांच्या घराचा दरवाजा उघडून रोख रकमेसह सोन्याचे दागिने असे ९0 हजार रुपयांची चोरी बुधवारी पहाटे झाली.
रामसगाव येथील गणेश पटेकर यांनी सागर स.सा.का. तीर्थपुरीला बैलगाडीने ऊसाचा पुरवठा करत आहे. ऊसतोड मजूर म्हणून काम करत आहे. त्यांना लहान ट्रॅक्टर वाहतुकीसाठी घ्यावयाचे असल्याने त्यांनी घरी पेटीत रोख रक्कम ७0 हजार व सोन्याचे दागिने ठेवले होते.
चोरट्यांनी ३0 डिसेंबरच्या रात्री ११ ते पहाटे ४ वाजेच्या दरम्यान उपरोक्त रक्कम चोरून नेली. उसतोडणीला जाण्याच्या तयारीत असताना त्यांना ही बाब लक्षात आली. या प्रकरणी गोंदी पोलिसात नोंद असून, अधिक तपास सपोनि. एम.एल. पवार हे करीत आहेत. या प्रकाराने पसिरात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)

Web Title: 90 thousand stolen from the farmhouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.