शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

गाझा-पॅलेस्टाईन मदतीच्या नावाने ९० लाख गोळा केले, छ. संभाजीनगरच्या डॉक्टरवर ATS चा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 16:21 IST

किराडपुऱ्यातील युनानी डॉक्टरचा धक्कादायक प्रकार : १०.२४ लाखांचे १४ व्यवहार परदेशात

 

छत्रपती संभाजीनगर : पॅलेस्टाईन, गाझामधील मदत कार्याला पाठिंबा देण्याचा दावा करून इमाम अहेमद रजा फाउंडेशन या अनधिकृत संस्थेच्या माध्यमातून एका युनानी डॉक्टरने शहरातील अनेकांकडून तब्बल ९० लाख रुपये निधी गोळा केला. यापैकी १० लाख २४ हजार रुपये एका विदेशी संकेतस्थळावरून विदेशात पाठवल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सय्यद बाबर अली सय्यद महेमूद (रा. बदाम गल्ली, किराडपुरा) असे संशयिताचे नाव असून, एटीएसच्या तपासात ही बाब निष्पन्न झाली. तूर्तास त्याच्यावर एटीएसने सिटी चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, बाबरने युनानी वैद्यकशास्त्रातील डिप्लोमा केला आहे.

एटीएसकडून गेल्या काही दिवसांपासून विविध स्वयंसेवी संस्थांची माहिती तपासली जात होती. यात इमाज अहेमद रजा फाउंडेशन ही संस्था फिलिस्तीन व गाझामधील युद्धाने प्रभावित झालेल्या नागरिकांसाठी सोशल मीडियावर क्युआर कोड पाठवून निधी गोळा करत असल्याचे एटीएसला समजले. तपास अधिकाऱ्यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे या संंस्थेची माहिती मागवली. त्यात ही संस्थाच नोंदणीकृत नसल्याचे समजले. या संस्थेचा चालक व संशयित आरोपी सय्यद बाबर हा रजा एम्पॉवरमेंट फाउंडेशन नावाने संस्था चालवतो. ही मुंबई येथे नोंदणीकृत आहे. मात्र, या संस्थेला विदेशी नागरिकांसाठी निधी गोळा करण्याचे अधिकार नाहीत. मात्र, तरीही बाबरने यू ट्यूब व अन्य सोशल मीडियाद्वारे अशा प्रकारे निधी गोळा करण्यासाठीचे व्हिडीओ टाकण्यास सुरुवात केली.

स्वत:च्या खात्यात रक्कमबाबरने निधीच्या नावाखाली स्वत:च्याच बँक खात्याचा स्कॅन कोड व्हायरल केला. ४ जुलै २०२४ ते ६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान त्याच्या खात्यात ९० लाख ९९ हजार ८९३ रुपये रक्कम जमा झाली. एटीएसने फिर्यादी होत सिटी चौक पोलिस ठाण्यात बाबरवर गुन्हा दाखल केला. त्याला नोटीस देऊन सोडण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांच्याकडे तपास सुपुर्द करण्यात आला.

दहा लाख दिले कोणाला ?मिळालेल्या रकमेपैकी बाबरने १० लाख २४ हजार रुपये gofundme.com या संकेतस्थळावर पाठवले. हे संंकेतस्थळ विदेशी आहे. मात्र, ते गाझा पट्टीसाठीच निधी गोळा करते की अन्य बाबींसाठी, याचा एटीएस व अन्य तपास यंत्रणा तपास करत आहेत. दिल्ली स्फोटांचा तपासादरम्यान देशभरातील बेनामी विदेशी व्यवहारांचा तपास सुरू आहे. त्यातच शहरातून गाझाच्या नावाखाली आर्थिक व्यवहार झाल्याने केंद्रीय तपास यंत्रणाही हादरून गेल्या. एटीएसने याबाबतची कागदपत्रे त्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. बाबर कोणाच्या संपर्कात होता, त्याने कुठे प्रवास केला, याची माहिती तपासली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Doctor Collects ₹90 Lakh for Gaza, ATS Investigates Fraud

Web Summary : A doctor in Chhatrapati Sambhajinagar collected ₹90 lakh for Gaza via an unauthorized foundation. ATS investigation revealed ₹10 lakh was sent abroad. Fraud case registered; probe ongoing into foreign connections and fund usage.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर