९० हजारांचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:17 IST2017-07-31T00:17:30+5:302017-07-31T00:17:30+5:30
गंगाखेड : शहरातील राजेंद्र पेठ गल्लीतील एका घरावर छापा टाकून सुमारे ८० हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थागुशा व उपविभागीय अधिकाºयांच्या पथकाने रविवारी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास केली.

९० हजारांचा गुटखा पकडला
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : शहरातील राजेंद्र पेठ गल्लीतील एका घरावर छापा टाकून सुमारे ८० हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थागुशा व उपविभागीय अधिकाºयांच्या पथकाने रविवारी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास केली.
शहरातील भगवती चौकातील दाड यांच्या किराणा दुकानातून गुटखा व सुगंधी तंबाखू विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
यावरुन रविवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अनिल इंगोले, संजय बर्ले यांनी राजेंद्र पेठ गल्लीतील सोनटक्के यांच्या वाड्यातील खोलीवर छापा टाकला. यावेळी या खोलीमध्ये गुटखा, सुगंधी तंबाखू असा ८० हजार रुपयांचा ऐवज आढळून आला.
या प्रकरणी राधिका किराणा दुकानाचे केदार दाड यांना ताब्यात घेतले असून जप्त माल पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. या प्रकरणी परभणी येथील अन्न सुरक्षा अधिकारी फिर्याद देणार असल्याची माहिती मिळाली. मात्र रात्री उशिरापर्यंत गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.