२० जागांसाठी ९० जणांचे अर्ज दाखल
By Admin | Updated: February 12, 2015 00:56 IST2015-02-12T00:51:59+5:302015-02-12T00:56:01+5:30
उस्मानाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असून, २० जागेसाठी ९० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत

२० जागांसाठी ९० जणांचे अर्ज दाखल
उस्मानाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असून, २० जागेसाठी ९० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज छाननीत संस्था प्रतिनिधी गटामधून चित्राव गोरे यांचा अर्ज बाद झाला असला तरी तेर गटामधून त्यांचा अर्ज वैध असल्याचे निवडणूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
तालुक्यातील केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरु झाली आहे. मंगळवारी १६ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. कारखान्याच्या निवडणुकीसाठी मागील पाच दिवसात १५१ नामनिर्देशन पत्राची विक्री झाली होते. मंगळवारी दिवसभर अर्जांची छाननी झाली. यात १६ उमेदवारांचे अर्ज बाद झाले . त्यात संस्था प्रतिनिधी गटामधून चित्राव अरविंद गोरे यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला होता. मात्र अर्ज छाननीच्या वेळी त्यांचा अर्ज बाद झाल्याने. २१ जागेसाठी होणारी निवडणूक आता वीस जागेसाठी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)