९ हजारावर उमेदवारांनी दिली परीक्षा
By Admin | Updated: November 23, 2014 00:26 IST2014-11-22T23:43:59+5:302014-11-23T00:26:20+5:30
बीड : जिल्हा परिषदेतील परिचरपदाच्या ३७ जागांसाठी शनिवारी ९ हजार ३८९ उमेदवारांनी परीक्षा दिली. विस्तार अधिकारी पदाच्या एका जागेसाठी १३६ जण परीक्षेला

९ हजारावर उमेदवारांनी दिली परीक्षा
बीड : जिल्हा परिषदेतील परिचरपदाच्या ३७ जागांसाठी शनिवारी ९ हजार ३८९ उमेदवारांनी परीक्षा दिली. विस्तार अधिकारी पदाच्या एका जागेसाठी १३६ जण परीक्षेला उपस्थित होते.
सकाळी १० ते ११:३० या वेळेत विस्तार अधिकारी सांख्यिकी पदाची तर दुपारी २ ते ३:३० या दरम्यान परिचरपदासाठी परीक्षा झाली. विस्तार अधिकारीपदासाठी २४४ अर्ज आले होते. १०८ जणांनी पाठ फिरवली. परिचरपदासाठी ३१०० उमेदवार गैरहजर राहिले. परीक्षेदरम्यान, कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. १२०० हून अधिक कर्मचारी प्रक्रियेत होते. परीक्षा सुरळीत पार पडल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. आर. भारती यांनी सांगितले. (प्रतिनिधी)