वाळूज उद्योगनगरीतील ९ लाखांचे साहित्य लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:06 IST2021-07-07T04:06:19+5:302021-07-07T04:06:19+5:30
:अज्ञात चोरट्यांनी ९ लाखाचे साहित्य लांबविले वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील लुनावत ऑटोमेशन या कंपनीत धाडसी चोरी करून अज्ञात ...

वाळूज उद्योगनगरीतील ९ लाखांचे साहित्य लांबविले
:अज्ञात चोरट्यांनी ९ लाखाचे साहित्य लांबविले
वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील लुनावत ऑटोमेशन या कंपनीत धाडसी चोरी करून अज्ञात चोरट्यांनी जवळपास ९ लाखांचे साहित्य लांबविल्याची घटना सोमवारी (दि.५) सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोमलकुमार प्रकाशचंद लुनावत (३३ रा. औरंगाबाद) यांची वाळूज एमआयडीसीतील लुनावत ऑटोमेशन कंट्रोल सिस्टीम या नावाची कंपनी आहे. रविवारी रात्री चोरट्यांनी पाठीमागील शटर उचकटून कंपनीत प्रवेश करीत कंपनीतील किंमती साहित्य पळविले. ही बाब लक्षात आल्यानंतर कोमलकुमार यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात संपर्क साधून या चोरीची माहिती दिली. ही माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक गौतम वावळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कंपनीत भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांनी सुमारे ९ लाखांचे साहित्य लांबविले. सहायक पोलीस निरीक्षक गौतम वावळे तपास करीत आहेत.