दलित वस्तीचे ९ कोटींचे प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:56 IST2017-08-16T23:56:25+5:302017-08-16T23:56:25+5:30
महापालिका हद्दीत दलित वस्ती निधीतून काम करण्यासाठी आणखी ९ कोटींचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत़ पूर्वीच्या जवळपास १६ कोटींच्या कामांचा निर्णय अद्याप लागलेला नसतानाच निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेने पुन्हो हे ९ कोटींच्या कामांचे प्रस्ताव पाठविले असल्याने या प्रस्तावाला मंजुरी मिळेल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़

दलित वस्तीचे ९ कोटींचे प्रस्ताव
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: महापालिका हद्दीत दलित वस्ती निधीतून काम करण्यासाठी आणखी ९ कोटींचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत़ पूर्वीच्या जवळपास १६ कोटींच्या कामांचा निर्णय अद्याप लागलेला नसतानाच निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेने पुन्हो हे ९ कोटींच्या कामांचे प्रस्ताव पाठविले असल्याने या प्रस्तावाला मंजुरी मिळेल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़
मागील वर्षीचे दहा कोटी रूपये योग्य नियोजनाअभावी परत गेल्यानंतर चालू वर्षाच्या निधीतून कामांना मंजुरी देण्यात आली़ जवळपास १६ कोटींची ही कामे मंजूर झाल्यानंतर या कामांबाबत पालकमंत्र्यांकडे तक्रारी करण्यात आल्या़ शिवसेनेच्या मनपातील पदाधिकारी व नगरसेवकांनी दलित वस्तीची कामे नियमबाह्यरित्या दिल्याची तक्रार केली होती़ त्यात दलित वस्ती असलेले मूळ प्रभाग सोडून दुसºयाच प्रभागात दलित वस्ती नसलेल्या ठिकाणी निधी दिल्याचा आरोपही केला होता़ सभागृह नेत्याच्या एकाच प्रभागात दोन कोटींची कामे दलित वस्तीतून करण्यात आल्याची बाबही निदर्शनास आणून दिली़ त्यामुळे या कामांना पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी स्थगिती दिली होती़
या विषयावर आ़ अमिता चव्हाण यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नही उपस्थित केला़ पुढे पालकमंत्र्यांनी कामावरील स्थगिती उठवली असली तरी भाजपाच्या प्रमुख पदाधिकाºयांनी दलित वस्ती प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आयुक्तांकडे केली़ या सर्व प्रकारामुळे महापालिकेनेही पुन्हा नगररचना विभागाच्या सहायक संचालकांकडून दलितवस्ती कामांची चौकशी केली़ त्यात अनेक कामे ही झालेली असतानाही पुन्हा नव्याने समाविष्ट केल्याचा अहवाल सादर केला होता़ या अहवालानंतर मनपाने आपली बाजू मांडल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले़