९५ % मतदान, आज फैसला !
By Admin | Updated: April 2, 2017 23:45 IST2017-04-02T23:41:13+5:302017-04-02T23:45:52+5:30
उदगीर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक मंडळासाठी रविवारी शांततेत मतदान झाले़

९५ % मतदान, आज फैसला !
उदगीर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक मंडळासाठी रविवारी शांततेत मतदान झाले़ यावेळी बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी प्रचंड स्पर्धा झाली आहे़ त्यातूनच कधी नव्हे ते इतके प्रचंड मतदान झाले़ सोसायटी, ग्रामपंचायत, हमाल मापाडी, व्यापारी अशा सर्वच गटातून सरासरी ९५़११ टक्के मतदान झाले आहे़ त्यामुळे निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, सोमवारी दुपारी २ पर्यंत संपूर्ण निकाल येण्याची अपेक्षा आहे़
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी रविवारी तालुक्यातील देवर्जन, वाढवणा, नागलगाव, नळगीर, हेर, मोघा व उदगीर शहरातील वेगवेगळ्या १७ केंद्रावर मतदान घेण्यात आले़ सोसायटी मतदारसंघातून ११ जागा निवडून द्यावयाच्या आहेत़ त्यासाठी ७९२ मतदार होते़ त्यापैकी ७८५ जणांनी हक्क बजावला़ सोसायटी मतदारसंघासाठी एकूण ९९़११ टक्के मतदान झाले़ ग्रामपंचायत मतदारसंघात चार जागा आहेत़ येथे ७५८ मतदार होते़ त्यापैकी ७४५ जणांनी मतदान केले़ या मतदारसंघात तब्बल ९८़२८ टक्के मतदान झाले़
व्यापारी गटासाठी बाजार समितीत २ जागा आहेत़ या गटात मतदार तब्बल १३७८ इतके आहेत़ त्यापैकी रविवारी १२३५ जणांनी मतदान केले़ तर हमाल मापाडी गटासाठी असलेल्या एका जागेसाठी झालेल्या लढतीत ४५५ पैैकी ४२६ मतदारांनी मतदान केले़