९५ टक्के मतदारांनी बजावला हक्क
By Admin | Updated: May 8, 2016 23:38 IST2016-05-08T23:20:51+5:302016-05-08T23:38:03+5:30
वाशी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ जागासाठी ९ मतदान केंद्रावर रविवारी शांततेत मतदान झाले. यावेळी ८१५ पैकी ७८० म्हणजेच ९५.७० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला

९५ टक्के मतदारांनी बजावला हक्क
वाशी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ जागासाठी ९ मतदान केंद्रावर रविवारी शांततेत मतदान झाले. यावेळी ८१५ पैकी ७८० म्हणजेच ९५.७० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याची मतमोजणी सोमवारी सहाय्यक निबंधक कार्यालयात होणार आहे.
वाशी बजार समितीच्या निवडणुकीसाठी ९ मतदानकेंद्राची निर्मिती करण्यात आली होती. वाशी येथे हमाल मापाडी, व्यापरी यांचे संयुक्त तर सोसायटीचे एक व ग्रामपंचायतीचे एक असे तीन केंद्र कार्यान्वित होते. तर पारगाव, पारा व तेरखेडा येथे सोसायटीचे व ग्रामपंचायतीचे प्रत्येकी दोन अशा सहा मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली होती.
हमाल मापाडी मतदार संघात ३२ पैकी २५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदार संघात दोघांमध्ये सरळ लढत होती. दोन जागांसाठी चौघे रिंगणात असलेल्या व्यापारी मतदार संघात ५७ पैकी ५६ मतदांरानी मतदान केले. तर ग्रामपंचायत मतदार संघात ३४५ पैकी ३३१ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे चार जागेसाठी आठ उमेदवार रिंगणात आहेत. सोसायटी मतदार संघात ३८१ पैकी ३६८ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला. या मतदार संघातून एकाची बिनविरोध निवड झाली असून, उर्वरित दहा जागांसाठी १९ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले.
सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयात सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. यात प्रारंभी हमाल मापडी नंतर व्यापारी मतदार संघाची मतमोजणी केली जाणार आहे. तिसऱ्या फेरीत ग्रामपंचायत मतदार संघाची तर चौथ्या फेरीत सोसायटी मतदार संघाची मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी महाळप्पा शिंदे यांनी दिली. सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयात पोलीस संरक्षणात मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)