९२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार
By Admin | Updated: January 18, 2015 00:27 IST2015-01-18T00:08:41+5:302015-01-18T00:27:17+5:30
भोकरदन : तालुक्यातील ९२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासनाच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली असुन प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

९२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार
भोकरदन : तालुक्यातील ९२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासनाच्या वतीने तयारी सुरू करण्यात आली असुन प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कामांसाठी २५३ अधिकारी व कर्मचाऱ्याच्या नेमणुका करण्यात आल्या असल्याची माहिती तहसिलदार अविशकुमार सोनोने व नायबतहसिलदार आऱजे़डोळे यांनी दिली आहे़
भोकरदन तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ९२ ग्रामपंचायतीची निवडणूक घेण्यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने हालचाली सुरू झाल्या आहेत. २०११ च्या जनगनणेनुसार प्रभाग रचना करणे त्याचप्रमाणे पदाचे आरक्षण करण्याच्या कामाला तहसिल कार्यालयाच्या वतीने सुरूवात करण्यात आली आहे. या कामासाठी एक अधिकारी सहाय्यक, व सहसहाय्यक अशा २५३ अधिकारी व कर्मचाऱ्याच्या नियुक्या करण्यात आल्या. तालुक्यातील वालसांवगी, पिपंळगाव रेणुकाई, धावडा, पारध बु, जळगाव सपकाळ, सिपोरा बजार, आव्हाणा, आन्वा, हासनाबाद, केदारखेडा, वाकडी, पिंपळगाव कोलते या मोठ्या ग्रामपंचायतीसह वाढोणा, कोसगाव, माळेगाव, सिरसगांव मंडप, पिंपळगाव थोटे, थिगळखेड, पिपळगाव सुतार, सुभानपुर, पारध खुर्द, पोखरी/मेहेगाव, हिसोडा बु, वालसा वडाळ, आन्वा पाडा, मालखेडा, वडोद तांगडा, वाकडी कुकडी, धोंडखेडा, कोदा, खडकी, निमगाव, चांदई टेपली, पळसखेडा पिंपळे, जवखेडा ठोंबरी, चांदई ठोंबरी, बोरगाव जहागीर, कल्याणी, कोठा जहागीर, पेरजापुर- राजापुर, प्रल्हादपुर, मुठाड, फत्तेपुर, आलापुर,रामपुर, दानापुर, भायडी- विरेगाव- तळणी, वजिरखेडा- देऊळगाव कमान, सिरसगाव वाघ्रृळ- बोरगाव खडक, गोषेगाव, जानेफळ गायकवाड, सुरंगळी, दहिगाव, आडगाव, भोरखेडा, विझोरा, टाकळी भोकरदन, कोदोली, लिंगेवाडी, पिपंळगाव शेरमुलकी, नळणी बु, लोणगाव, कोठा दाभाडी, बानेगाव, सोयगाव देवी, चिंचोली - देऊळगाव ताड, केदारखेडा - बामखेडा - मेरखेडा, हिसोडा खुर्द, बंरजळा सांबळे, दावतपुर, बाभुळगाव, वाडी बु,हिसोडा खुर्द,बरंजळा सांबळे, दावतपुर, बाभुळगाव, वाडी बु, तांदुळवाडी, बंरजळा लोखडे, पळसेखडा मुर्तड, चांदई एक्को, उमरखेड, तळेगाव, खंउाळा, सावखेडा-खादगाव, रजाळा- पंढरपुरवाडी, बेलोरा, गोद्री, कठोरा बजार, कोळेगाव, गारेखेडा - जोमाळा, कोपर्डा, लेहा, मलकापुर, तडेगाव - तडेगाववाडी, नळणी खुर्द - समर्थ नगर, जानेफळ दाभाडी- टाकळी, ईब्राहीमपुर - नसिराबाद या ९२ ग्रामपचयतीच्या निवडणुका लवकरच घेण्यात येणार असल्यामुळे प्रशासणाच्या वतीने निवडणुक पुुर्व तयारीला सुरूवात करण्यात आली असल्याचे तहसिलदार सोनोने, नायब तहसिलदार आऱ जे़ डोळे, आऱ जी़ राठोड यांनी दिली आहे़ (वार्ताहर)