आरटीओ कार्यालयातील आठ फॅनची चोरी

By Admin | Updated: March 15, 2016 01:13 IST2016-03-15T00:20:00+5:302016-03-15T01:13:46+5:30

लातूर : लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील भिंतीवरील आठ फॅनची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना ११ मार्चरोजी मध्यरात्री घडली.

8ft stolen from RTO office | आरटीओ कार्यालयातील आठ फॅनची चोरी

आरटीओ कार्यालयातील आठ फॅनची चोरी


लातूर : लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील भिंतीवरील आठ फॅनची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना ११ मार्चरोजी मध्यरात्री घडली. या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात मोटार वाहन निरीक्षक यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर शहरातील बाभळगाव रोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी कार्यालय बंद झाल्यानंतर रात्रीच्यावेळी लोखंडी दार तोडून आता प्रवेश केला. दरम्यान यावेळी कार्यालयात कोणीच नसल्याच्या संधीचा फायदा घेत ११ मार्चरोजीच्या मध्यरात्री एकूण आठ फॅन चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. सकाळी १२ मार्चरोजी कार्यालयातील आठ फॅन गायब झाल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर दोन दिवस कार्यालयातील वॉचमन, शिपाई आणि इतर कर्मचाऱ्यांकडे याबाबत अधिक चौकशी, विचारणा करण्यात आली. याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना कुठलाही सुगावा लागला नाही. एकाच रात्री कार्यालयातील भिंतीला अडकविलेले आठ फॅन चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे.
शेवटी या प्रकरणी मोटार वाहन निरीक्षक गोविंद पवार (२९) यांनी सोमवारी दुपारी दिलेल्या फिर्यादीवरुन लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम ४५४, ४५७ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 8ft stolen from RTO office