८८५ अंगणवाड्या भाड्याच्याच इमारतीत
By Admin | Updated: July 23, 2014 00:31 IST2014-07-23T00:03:09+5:302014-07-23T00:31:20+5:30
बाळासाहेब जाधव , लातूर ३ ते ६ वयोगटातील चिमुकल्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या वतीने जिल्ह्यात २४०८ अंगणवाड्या कार्यरत आहेत.

८८५ अंगणवाड्या भाड्याच्याच इमारतीत
बाळासाहेब जाधव , लातूर
३ ते ६ वयोगटातील चिमुकल्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या वतीने जिल्ह्यात २४०८ अंगणवाड्या कार्यरत आहेत. त्यापैकी १५२३ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत आहे. तर उर्वरित ८८५ अंगणवाड्यांना मात्र स्वत:ची इमारत नाही. त्यामुळे बालगोपाळांची गैरसोय होते. उन्हाळा व पावसाळ्याचा त्यांना त्रास सहन करावा लागतो.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे या अंगणवाड्यांवर नियंत्रण आहे. दरवर्षी अंगणवाडी बांधकामासाठी ५ कोटींचा निधी येतो. अंगणवाड्यांतील अन्य उपक्रमांचा काही निधी व ५ कोटींचा निधी याचा ताळमेळ घालून वर्षाला किमान १५० अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यात येते. त्यानुसार १५२३ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत झाली आहे. मात्र आणखीन ८८५ अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारतीची प्रतीक्षा आहे. सध्या या अंगणवाड्या ग्रा.पं.च्या सार्वजनिक जागेत किंवा भाड्याच्या जागेत भरविल्या जातात. इथे मुलांना पुरविण्यात येणारा सकस आहार ठेवायला जागाही नाही. शैक्षणिक साहित्य ठेवण्याचीही अडचण, अशा विविध अडचणींचा सामना या अंगणवाड्यांना करावा लागत आहे.
निधी मिळाल्यास बांधकाम़़़
जिल्ह्यातील २ हजार ४०८ अंगणवाड्यापैकी चिमुकल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्यासाठी १५२३ अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यात आले़ परंतु, बजेटअभावी उर्वरित विद्यार्थ्यांना खाजगी इमारती, समाज मंदिर व इतर शासकीय कार्यालयात आधार घ्यावा लागत आहे़ दरवर्षी १२५ अंगणवाड्याच्या बांधकामाची मान्यता मिळत असल्याने उर्वरित इमारतींचे काम टप्प्या-टप्प्याने पूर्ण केले जाईल, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश कांगणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़