८७ कोटींचे देयके अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:51 IST2017-08-20T00:51:48+5:302017-08-20T00:51:48+5:30

नाफेडमार्फत जिल्ह्यातील पाच हमीभाव खरेदी केंद्रावर डिसेंबर २०१६ ते १० जून २०१७ पर्यंत १ लाख ७३ हजार ११३ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली होती. या तुरीच्या खरेदीच्या देयकापोटी ८७ कोटी ४२ लाख २४ हजार ९४२ रुपयांचे देयके टप्प्या टप्प्याने नाफेडच्या वतीने शेतकºयांना अदा करण्यात आले आहेत. त्यामुळे तूर उत्पादक शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

87 crores paid bills | ८७ कोटींचे देयके अदा

८७ कोटींचे देयके अदा

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : नाफेडमार्फत जिल्ह्यातील पाच हमीभाव खरेदी केंद्रावर डिसेंबर २०१६ ते १० जून २०१७ पर्यंत १ लाख ७३ हजार ११३ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली होती. या तुरीच्या खरेदीच्या देयकापोटी ८७ कोटी ४२ लाख २४ हजार ९४२ रुपयांचे देयके टप्प्या टप्प्याने नाफेडच्या वतीने शेतकºयांना अदा करण्यात आले आहेत. त्यामुळे तूर उत्पादक शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
जिल्ह्यामध्ये गतवर्षी समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे खरीपा पाठोपाठ रब्बी हंगामातही चांगली पिके बहरली. त्यातून शेतकºयांना चांगले उत्पन्न मिळाले. व्यापाºयांकडून शेतकºयांचा शेतीमाल घेताना अडवणूक केली जाऊ लागली. त्यामुळे शेतकºयांचा रोष पाहता जिल्ह्यामध्ये परभणी, मानवत, जिंतूर, गंगाखेड, सेलू या पाच ठिकाणी शासनाला हमीभाव केंद्र सुरु करावे लागले. यामध्ये अनेक अडचणींचा सामना शेतकºयांना करावा लागला. १५-१५ दिवस रांगेत उभे राहून शेतकºयांना तूर विक्री करावी लागली. एवढ्या अडचणीचा सामना शेतकºयांनी केल्यानंतर नाफेडकडून सुरु करण्यात आलेल्या पाच हमीभाव केंद्रावर डिसेंबर २०१६ ते १० जून २०१७ पर्यंत १ लाख ७३ हजार ११३.८५ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. या खरेदीपोटी तूर उत्पादक शेतकºयांना ८७ कोटी ४२ लाख २४ हजार ९४२ रुपये नाफेडकडून अदा करण्यात आले. यामध्ये परभणी येथील हमीभाव केंद्रावर विक्री तूर उत्पादक शेतकºयांना २६ कोटी २० लाख ६४ हजार ७०० रुपये, मानवत केंद्रावरील तूर उत्पादक शेतकºयांना १८ कोटी २१ लाख १५ हजार ६२५, जिंतूर येथील केंद्रातून १८ कोटी ५४ लाख ६८ हजार ८२५, गंगाखेड १२ कोटी ११ लाख ३१ हजार ८२५, सेलू येथील केंद्रातून १२ कोटी ३४ लाख ४३ हजार ९६४ रुपयांची देयके अदा करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: 87 crores paid bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.