मेंदूविकार शिबिरात ८५० रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:13 IST2017-09-17T00:13:47+5:302017-09-17T00:13:47+5:30

शहरातील मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात घेण्यात आलेल्या मेंदूविकार शिबिराचा शनिवारी समारोप करण्यात आला़ तीन दिवसांच्या या शिबिरात जुन्या व नव्या अशा तब्बल ८५० रुग्णांची तपासणी करण्यात आली.

850 patients examined in brainworm camp | मेंदूविकार शिबिरात ८५० रुग्णांची तपासणी

मेंदूविकार शिबिरात ८५० रुग्णांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरातील मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात घेण्यात आलेल्या मेंदूविकार शिबिराचा शनिवारी समारोप करण्यात आला़ तीन दिवसांच्या या शिबिरात जुन्या व नव्या अशा तब्बल ८५० रुग्णांची तपासणी करण्यात आली.
मुंबई येथील जयवकील फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटर, बी़जे़ वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल मुंबई व राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान मेंदूचे विकार असणाºया मुला व मुलींकरिता मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते़ या शिबिरासाठी नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, बीड, औरंगाबाद, जालना, नाशिक आदींसह आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यातील रुग्णही आले होते. रुग्णांवर मुंबई येथून आलेल्या पेडियाट्रिक न्युरोलोजिस्ट डॉ. अनैता हेगडे, डॉ. पूर्वा केणी, डॉ. सोनम कोठारी, डॉ. आशा चिटणीस, डॉ. मीनाक्षी पेहरवाणी, डॉ. तृप्ती निखारगे, डॉ. सायली परब, डॉ. पूजा चोरमाळे, डॉ. मोहिनी शाह, डॉ. अश्विनी कुमार, डॉ. रोहित जैन, डॉ. मंदार आगाशे, डॉ. पवन गुप्ता, डॉ. सुजाता बनसोडे यांनी तपासणी व उपचार केले़
कार्यक्रमास राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, उपाध्यक्ष रामनारायण काबरा, सचिव प्रकाश मालपाणी, रामलाल बाहेती, बनारसीदास अग्रवाल, कमल कोठारी, जयप्रकाश काबरा, डॉ. लक्ष्मीकांत बजाज आदी उपस्थित होते़

Web Title: 850 patients examined in brainworm camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.