८५ वर्षांचा तरुण उतरला पाचोडच्या निवडणूक मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:11 IST2021-01-08T04:11:12+5:302021-01-08T04:11:12+5:30

पाचोड ग्रामपंचायत निवडणुकीत अगोदरच मंत्री संदीपान भुमरे यांच्या गटातील तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे पाचोड गावात आता ...

An 85-year-old man entered the election field of Pachod | ८५ वर्षांचा तरुण उतरला पाचोडच्या निवडणूक मैदानात

८५ वर्षांचा तरुण उतरला पाचोडच्या निवडणूक मैदानात

पाचोड ग्रामपंचायत निवडणुकीत अगोदरच मंत्री संदीपान भुमरे यांच्या गटातील तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे पाचोड गावात आता १४ जागांसाठी फक्त २८ उमेदवार रिंगणात आहेत. पाचोड ग्रामपंचायत ही गेल्या पंचवीस वर्षांपासून संदीपान भुमरे यांच्या ताब्यात आहे. यावेळीही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी त्यांच्यासह सभापती राजू भुमरे, जि. प. सदस्य विलास भुमरे यांनी कंबर कसली आहे. भुमरे गटातील तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. बद्रीनारायन भुमरे यांना मात्र हादरा बसला आहे. येथे भाजपा विरूद्ध शिवसेना अशी लढत होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मावळत्या ग्रामपंचायतीच्या सरपंच मनीषा पवन तारे व विद्यमान उपसरपंच राजू भुमरे पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. कार्यकर्ते चौकाचौकांत बैठका घेत असून ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. पाचोड व पाचोड परिसरातील विविध गावांत होत असलेल्या लढती प्रामुख्याने दुरंगी होत आहेत.

पाचोड परिसरातील प्रामुख्याने आडगाव जावळे , मुरमा , कोळीबोडखा , दादेगाव हजारे या गावांतील लढती तुल्यबळ होणार असल्याचे चित्र दिसत आहे

चौकोट

५०३४ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

पाचोड ग्रामपंचायतमध्ये १७ जागांसाठी निवडणूक होत आहे. यात नऊ महिला उमेदवार व आठ पुरुष उमेदवारांना निवडून द्यायचे आहे. यात शिवसेनेकडून नऊ महिला व आठ पुरुष उमेदवार रिंगणात आहेत. तर विरोधी भाजपकडून तीन महिला उमेदवार व सहा पुरुष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

फोटो : बापुदेव गोरदे

ग्रामपंचायतचा फोटो

Web Title: An 85-year-old man entered the election field of Pachod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.