शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

८५ तोळे सोने, २७ लाख रोकड; लाचखोर अभियंता संजय पाटीलच्या लॉकरमध्ये लाखोंचे घबाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 19:44 IST

फक्त एकाच बँकेतील लॉकर उघडले आहे. या लॉकरशिवाय इतरही बँकांमध्ये लाॅकर असण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली.

औरंगाबाद : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलेला सा. बां. विभागाचा शाखा अभियंता संजय राजाराम पाटील (५२, रा. डी १, गुरुगणेश अपार्टमेंट, उल्कानगरी) यांच्या बुधवारी घेतलेल्या घरझडतीत लाखो रुपयांचे घबाड पथकाच्या हाती लागले. बँकेच्या लॉकर आणि घरात तब्बल ८५.५ तोळे सोने आणि २७ लाख ६५ हजार ६८३ रुपये रोख सापडले.

शहरातील पद्मपुरा भागातील सा. बां. विभागाच्या कार्यालयात वर्ग २ चा अधिकारी असलेला संजय पाटील याने मुकुंदवाडीतील मारोती मंदिराच्या सभागृह बांधकामाचे बिल काढून देण्यासाठी १ लाख २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती १ लाख रुपये लाच देण्याचे तक्रारदाराने मान्य केले होते. एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर शनिवारी उल्कानगरी येथील रिद्धी-सिद्धी हॉलसमोरील रस्त्यावरच ठरलेल्या लाचेच्या पहिल्या हप्त्यापोटी ४० हजार रुपये स्वीकारताना पाटीलला रंगेहाथ पकडण्यात आले.

या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. नंतर पाटीलच्या घराची झडती घेण्यात आली. त्यामध्ये १ लाख ६१ हजार रुपये रोख आणि १८३ ग्रॅम म्हणजेच १८ तोळे ३ ग्रॅम सोने सापडले. त्याच वेळी दशमेशनगर येथील एसबीआय बँकेतील लॉकरच्या चाव्याही सापडल्या. एसीबीच्या पथकाने हे लॉकर बुधवारी उघडले. त्यामध्ये ६७२ ग्रॅम (६७ तोळे) सोने आणि २६ लाख ४ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम सापडली. ही कारवाई अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर अधीक्षक विशाल खांडे, उपअधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक गोरखनाथ गांगुर्डे, निरीक्षक दीपाली निकम यांच्या पथकाने केली.

आरोपीला एका दिवसात जामीनशाखा अभियंता संजय पाटील यास लाच घेताना पकडल्यानंतर अटक करण्यात आली होती. त्यानंतर एका दिवसात आरोपीला जामीन मंजूर झाला असल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कोट्यवधींची स्थावर मालमत्ताएसीबीच्या पथकाला पाटील याच्याकडे सापडलेले सोने आणि रोख रक्कम ही एकूण संपत्ती पाऊण कोटीपर्यंतची आहे. वर्ग २ च्या अधिकाऱ्याकडे पाऊण कोटीची जंगम मालमत्ता सापडल्यामुळे बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे. पाटीलकडे कोट्यवधी रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही स्थावर मालमत्ता फ्लॅट, प्लॉट आणि जमीन, बंगला यामध्ये गुंतवलेली असण्याची शक्यताही एसीबीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. संजय पाटील याच्याविरोधात आर्थिक मिळकतीपेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात येऊ शकतो. त्याच्या स्थावर मालमत्तेची खुली चौकशी होणार असल्याचेही एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

चार दिवसांनी लॉकर उघडलेसंजय पाटील यास शनिवारी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यानंतर चौथ्या दिवसानंतर त्याचे एसबीआय बँकेतील लॉकर उघडण्यात आले आहे. फक्त एकाच बँकेतील लॉकर उघडले आहे. या लॉकरशिवाय इतरही बँकांमध्ये लाॅकर असण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली. त्यासाठी तपासी अधिकाऱ्यांनी अधिक तत्पर होऊन तपास करणे गरजेचे असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग