८४ विद्यार्थ्यांना मिळाली नोकरी
By Admin | Updated: November 28, 2014 01:17 IST2014-11-28T01:01:40+5:302014-11-28T01:17:06+5:30
औरंगाबाद : विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभागात आज दिवाळी साजरी झाली. मुंबईच्या ‘आलंबिक टचिंग’ कंपनीने गुरुवारी परिसर मुलाखतीद्वारे तब्बल ३७

८४ विद्यार्थ्यांना मिळाली नोकरी
औरंगाबाद : विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभागात आज दिवाळी साजरी झाली. मुंबईच्या ‘आलंबिक टचिंग’ कंपनीने गुरुवारी परिसर मुलाखतीद्वारे तब्बल ३७ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली. यंदा द्वितीय वर्षात शिकत असलेल्या एकूण ११५ विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत ८४ विद्यार्थ्यांचे परिसर मुलाखतीच्या माध्यमातून भाग्य उजळले, हे विशेष!
यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभागाचे संचालक डॉ. वाल्मीक सरवदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, यंदा द्वितीय वर्षामध्ये ११५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. डिसेंबर महिन्यात या विद्यार्थ्यांची तृतीय सत्राची परीक्षा आहे.
त्यानंतर चौथ्या व शेवटच्या सत्राची परीक्षा होईल. तत्पूर्वीच विविध १२ कंपन्यांनी व्यवस्थापनशास्त्र विभागात येऊन परिसर मुलाखती घेतल्या. त्यामध्ये यापूर्वी ४७ विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली. आज गुरुवारी सकाळी मुंबई येथील ‘आलंबिक टचिंग’ या कंपनीचे व्यवस्थापक चित्रा शेट्टी, अंकिता मिश्रा, सचिन थोरात व रवींद्र ढाकोरकर आदींनी परिसर मुलाखतीचे आयोजन केले होते. या मुलाखतीमध्ये द्वितीय वर्षाच्या ३७ विद्यार्थ्यांची चांगल्या हुद्द्यावर व चांगल्या पगारावर निवड करण्यात आली.
शिक्षण सुरू असतानाच नोकरी मिळणे, हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस असतो. आजच्या परिसर मुलाखतीद्वारे एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल विभागाचे विद्यार्थी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असल्याची भावना प्लेसमेंट आॅफिसर डॉ. फारुख खान यांनी सांगितले.४
विविध नामांकित कंपन्यांसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे चौथे सत्र हे प्रोजेक्ट रिपोर्ट सादरीकरणाचे असते. यासाठी विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये तीन महिने काम करून प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागतो. ४
त्याअगोदरच विभागातील तब्बल ८४ विद्यार्थ्यांचे भाग्य उजळले. हे विद्यार्थी कंपन्यांमध्ये नोकरी करीत प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करतील, असे डॉ. वाल्मीक सरवदे यांनी सांगितले.