८३०७ शिष्यवृत्तीचे अर्ज अद्याप प्रलंबितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:07 IST2017-08-28T00:07:30+5:302017-08-28T00:07:30+5:30
शासनाकडून दिली जाणारी अल्पसंख्यांक मेट्रीकपुर्व शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या ८३०७ विद्यार्थ्यांची माहिती शाळास्तरावरच प्रलंबित आहे. सदर विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण विभागाकडे ३१ आॅगस्ट पर्यंत जिल्हा लॉगईनला सादर करणे गरजेचे आहे. मात्र अद्यापही माहिती शाळास्तरावच असल्याने आता अवघ्या तिन दिवसांत ही प्रक्रिया पार पडेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

८३०७ शिष्यवृत्तीचे अर्ज अद्याप प्रलंबितच
हिंगोली : शासनाकडून दिली जाणारी अल्पसंख्यांक मेट्रीकपुर्व शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या ८३०७ विद्यार्थ्यांची माहिती शाळास्तरावरच प्रलंबित आहे. सदर विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण विभागाकडे ३१ आॅगस्ट पर्यंत जिल्हा लॉगईनला सादर करणे गरजेचे आहे. मात्र अद्यापही माहिती शाळास्तरावच असल्याने आता अवघ्या तिन दिवसांत ही प्रक्रिया पार पडेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आर्थिक दुर्बल घटकांतील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शासनाकडून अर्थसहाय्य केले जाते. ज्यामुळे ते शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहतील. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यावर एक हजार रूपये रक्कम जमा केली जाते. परंतु अद्यापही संबधित शाळांनी विद्यार्थ्यांची माहिती जिल्हा लॉगीनवर सादर केली नाही. यामध्ये एकूण ८३०७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शिवाय ३१ आॅगस्ट शिक्षण विभागाकडे आॅनलाईन अर्ज सादर करायची शेवटची तारीख आहे. परंतु संबधित शाळा व मुख्याध्यापकांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच अजूनही विद्यार्थ्यांची माहिती शाळास्तरावरच उपलब्ध असल्याचे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले.
शासनाकडून दरवेळेस शिष्यवृत्तीचे आॅनलाईन अर्जासाठी मुदतवाढ मिळते. त्यामुळे सदर माहिती वेळेत सादर केली जात नसल्याचे चित्र नित्याचेच बनले आहे. विशेष म्हणजे दरवेळेस विद्यार्थ्यांची माहिती वेळेत सादर करण्याच्या शिक्षणाधिकाºयांकडून संबंधित गशिअ यांना वारंवार सूचना दिल्या जातात. याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते.