जायकवाडी धरणात ८२.१० % जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:52 IST2017-09-09T00:52:36+5:302017-09-09T00:52:36+5:30
जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे शुक्रवारी जायकवाडी धरणात ६६२५ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू होती. यामुळे धरणाचा जलसाठा सायंकाळी ८२.१० टक्के एवढा झाला होता.

जायकवाडी धरणात ८२.१० % जलसाठा
लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे शुक्रवारी जायकवाडी धरणात ६६२५ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू होती. यामुळे धरणाचा जलसाठा सायंकाळी ८२.१० टक्के एवढा झाला होता. जायकवाडी धरणाची पाणीपातळी १५१८.५३ फूट झाली असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता फक्त साडेतीन फूट पाणी लगणार आहे.
जून २०१७ पासून जायकवाडी धरणात एकूण ५९.७९ टी.एम.सी. पाणी दाखल झाले आहे. यामुळे धरणात आता एकूण पाणीसाठा २५१८.९४१ दलघमी ( ८८.९४ टी.एम.सी.) एवढा झाला आहे. यापैकी जीवंत पाणीसाठा १७८०.८३५ दलघमी (६२.८८ टी.एम.सी.) एवढा आहे. गेल्या २४ तासात धरणावर ३३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून १ जून २०१७ पासून धरणावर एकूण ५०० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.