परळीत ८१ जणांनी केले रक्तदान
By Admin | Updated: August 7, 2014 01:45 IST2014-08-07T00:42:23+5:302014-08-07T01:45:27+5:30
परळी: येथील अरिहंत जैन संघटनेच्या वतीने रक्त तपासणी शिबीर घेण्यात आले. यामध्ये ३३० जणांनी रक्तगट तपासणी करुन ८१ जणांनी रक्तदान केले.

परळीत ८१ जणांनी केले रक्तदान
परळी: येथील अरिहंत जैन संघटनेच्या वतीने रक्त तपासणी शिबीर घेण्यात आले. यामध्ये ३३० जणांनी रक्तगट तपासणी करुन ८१ जणांनी रक्तदान केले. हा कार्यक्रम सोमवारी पार पडला.
रक्तावर आधारित असलेल्या विविध प्रकारच्या ४६ तपासण्या या शिबिरात करण्यात आल्या. रक्तामधील हिमोग्लोबीनचे प्रमाण, थायरॉईड, रक्त गोठविणाऱ्या प्लेटलेटस्, लिक्वीड प्रोफाईल, लिव्हर प्रोफोईल, किडनी प्रोफाईल, थायरॉईड व मधुमेह यासारख्या विविध प्रकारच्या तपासणी शिबिरात करण्यात आल्या. यामध्ये ३३० जणांनी रक्त तपासणी केली. सकाळपासून या शिबिरासाठी परिसरातील नागरिकांनी तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आहारापूर्वी व आहारानंतर अशा दोन टप्प्यात ही तपासणी पार पडली.
याच शिबिरात ‘फ्रेंडशिप डे’चे औचित्य साधून ८१ जणांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना अरिहंत संघटनेच्या वतीने भेटवस्तू देण्यात आल्या. जैन श्रावक संघ यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर घेण्यात आले. प्रीतम बोरा, नीरज बडेरा, डॉ. दिनेश लोढा, आशिष गादिया, कुलभूषण जैन, संतोष ललवाणी, सचिन कोटेचा, कल्पेश ललवाणी, रोहित लोढा, रुपेश मंडलेचा आदी उपस्थित होते.(वार्ताहर)