शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजी विक्रेता महिलेच्या चिमुकलीसोबत ८० वर्षीय वृद्धाचे अश्लील चाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 17:59 IST

८० वर्षीय वृध्दाचे चिमुकलीसोबत अश्लिल चाळे; सतर्क महिलेमुळे अनर्थ टळला, पोलिसांनी आरोपी वृद्धास ताब्यात घेतले आहे

वाळूज महानगर: आजोबासमान एका ८० वर्षीय वृध्द इसमाने एका अडीच वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (दि.२७) उद्योगनगरीत घडली. यावेळी एका सतर्क महिलेने हा घृणास्पद प्रकार पाहून त्याचे चित्रीकरण करत पुरावा तयार केल्याने ही गंभीर घटना उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी रामलाल धोंडीबा कुकलारे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

वाळूजमहानगरात वास्तव्यास असणारी पिडीता मधू (२.५ वर्ष, नाव बदलले आहे) या चिमकुलीचे वडील उद्योगनगरीत एका कंपनीत काम करतात तर तिची आई भाजीपाला विक्री करुन कुटुंबास हातभार लावते. शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मधूला सोबत घेऊन तिची आई भाजीपाला विक्री करण्यासाठी आपल्या दुकानात गेली होती. भाजीपाला विक्री करत असताना मधू समोरच्या ओट्यावर खेळत होती. तेथे एक वृध्द इसम हा अगोदरच बसलेला. त्याने कोणी पाहत नसल्याची खात्री करत मधूला मांडीवर बसवत तिच्यासोबत अश्लील चाळे करु लागला. हा प्रकार शेजारील महिलेच्या निदर्शनास आला. तीने लागलीच या घृणास्पद प्रकारचे चित्रीकरण करत मधूच्या आईला दाखवले. 

घाबरलेल्या आईने मधूला त्या वृद्धाजवळून उचलून घेतले. या प्रकाराची माहिती कंपनीतील मधूच्या वडिलांना दिली. काही वेळाने पती-पत्नीने आपल्या काळजाचा तुकडा मधूला सोबत घेऊन पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांना घडलेला प्रकार सांगत मोबाईलमधील चित्रीकरण दाखवले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी रामलाल धोंडीबा कुकलारे (८०) याच्याविरुध्द वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आज शनिवारी सकाळी आरोपी रामलाल कुकलारे याला पोलिसांनी जेरबंद केले. न्यायालयाने त्याची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद