शिकाऊ डॉक्टरला ८० हजारांचा गंडा
By Admin | Updated: July 7, 2017 01:16 IST2017-07-07T01:06:53+5:302017-07-07T01:16:15+5:30
औरंगाबाद : आॅनलाइन खरेदीचे आमिष दाखवून एका मोबाइलधारकाने एमजीएम मेडिकल कॉलेज येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची ८० हजार २०० रुपयांची आॅनलाइन फसवणूक केली.

शिकाऊ डॉक्टरला ८० हजारांचा गंडा
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आॅनलाइन खरेदीचे आमिष दाखवून एका मोबाइलधारकाने एमजीएम मेडिकल कॉलेज येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची ८० हजार २०० रुपयांची आॅनलाइन फसवणूक केली. ही घटना २८ जून ते १ जुलैदरम्यान घडली.
पोलिसांनी सांगितले की, मूळची तेलंगणा राज्यातील रहिवासी कार्त्या मुथ्यम रेड्डी ही विद्यार्थिनी सिडकोतील एमजीएम मेडिकल कॉलेज येथे शिक्षण घेत आहे. २९ जून रोजी ती वसतिगृहात असताना अज्ञात मोबाइलधारकाने तिला फोन केला आणि आॅनलाइन खरेदी केल्यास भक्कम डिस्काऊंट मिळेल असे सांगितले.
यासाठी मोबाइलधारकाने त्यांच्या बँक खात्याची माहिती विचारली. त्यानंतर आरोपीने एसबीआय एटीएम कार्डचा वापर करून १६ हजार ८०० रुपयांचे आणि ६३ हजार ४०० रुपयांची आॅनलाइन खरेदी करून तक्रारदारांची फसवणूक केली.
तक्रारदारांच्या खात्यातून ही रक्कम कपात झाल्याची माहिती त्यांनी बँकेतून मिनी स्टेटमेंट घेतल्यानंतर समजली. यानंतर त्यांनी सिडको पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक एम. एस. बारगळ तपास करीत आहेत.