८० लाखाला फसविले !
By Admin | Updated: August 18, 2015 00:53 IST2015-08-18T00:26:34+5:302015-08-18T00:53:35+5:30
लातूर : कमी दरात पनवेल नवी मुंबई येथे प्लॉट खरेदी करून देतो म्हणून लातूर येथील एकाला ८० लाखाला दोघा जणांनी फसविल्याची घटना घडली

८० लाखाला फसविले !
लातूर : कमी दरात पनवेल नवी मुंबई येथे प्लॉट खरेदी करून देतो म्हणून लातूर येथील एकाला ८० लाखाला दोघा जणांनी फसविल्याची घटना घडली. याबाबत लातूरच्या शिवाजी नगर पोलिसांत सोमवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील अमोल शत्रुघ्न देशमुख (ह.मु. लातूर) यांना पनवेल नवी मुंबई येथील राजू पुंडलिक देशपांडे व अन्य एकाने कमी दरात पनवेल नवी मुंबई येथे प्लॉट घेऊन देतो म्हणून विश्वासात घेतले. त्यांच्याकडून ८० लाख रुपयांची रक्कमही घेतली. परंतु, प्लॉट खरेदी करून दिला नाही. शिवाय, ८० लाखांची रक्कमही परत दिली नाही, असे अमोल शत्रुघ्न देशमुख यांनी शिवाजी नगर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार राजू पुंडलिक देशपांडे व अन्य एकाविरुद्ध कलम ४२०, ४०६, ३४ भादंविप्रमाणे शिवाजी नगर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)