जिल्ह्यात ८९ टक्के पेरणी !

By Admin | Updated: August 2, 2014 01:38 IST2014-08-02T00:51:17+5:302014-08-02T01:38:03+5:30

उस्मानाबाद : अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली होती. आजघडीला जिल्हातील ८९ टक्के पेरणी उरकली आहे. आणखी ४० हजार हेक्टवरील पेरणी होणे बाकी आहे.

8 percent of sowing in the district! | जिल्ह्यात ८९ टक्के पेरणी !

जिल्ह्यात ८९ टक्के पेरणी !

उस्मानाबाद : अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली होती. आजघडीला जिल्हातील ८९ टक्के पेरणी उरकली आहे. आणखी ४० हजार हेक्टवरील पेरणी होणे बाकी आहे. असे असले तरी अनेक शेतकऱ्यांनी पेरणी करूनही बियाण्याची उगवण झालेली नाही. अशा शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
कृषी विभागाने खरीप पेरणीसाठी ३ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. वेळेवर पेरणी उरकेल, अशी अपेक्षा असतानाच पावसाने ओढ दिली. अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या सुरूवातीला सलगत तीन-चार दिवस संततधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी चाढ्यावर मुठ धरली. आजघडील ३ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरणी उरकल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यात ५३०.२०० हेक्टरवर पेरणी झाली आहे, तुळजापूर तालुक्यात ५६ हजार ९०० हेक्टर, उमरग्यात ६६ हजार ७००, लोहारा २८ हजार ६००, कळंब ७ हजार ३००, वाशी ३२ हजार २००, भूम २७ हजार ५०० हेक्टर तर परंडा तालुक्यात १० हजार ५०० असे एकुण जिल्ह्यात ३ लाख ४८ हजार ३०० हेक्टर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
मंडळनिहाय पाऊस
१०० मिमी पेक्षा कमी : जागजी मंडळाअंतर्गत ९७.०१ मि.मि पाऊस पडला आहे. तसेच सावरगांव ८१, परंडा ६८, वालवड ९९, ईटकूर ५८, मुळज ८० तर पारगांव ८७ मिमी.
१०० ते १२५ मिमी पर्यंत : पाडोळी ११२.४ , तेर १२५, ईटकळ १०७, जळकोट १२३, आसू १०४, जवळा १०१, मोहा १०७, डाळिंब सर्कलमध्ये १२५ मिमी.
१२५ ते १५० मिमी पर्यंत : ढोकी १३३, सलगरा १३३, नळदुर्ग १४३, अंबी १२६, मुरुम १३४, लोहारा १३२.०८ , माकणी १२८ मिमी.
१५० ते १७५ मिमी पर्यंत : बेंबळी १५६, मंगरुळ १५७, केशेगाव १५६, अनाळा १५६, सोनारी १६२, माणकेश्वर १५२, ईट १५५, कळंब १७०, गोविंदपूर व नारंगवाडी या दोन मंडळात १७२ मिमी.उमरगा १९० व जेवळी १९६ या दोन मंडळात १७५ ते २०० मिमी पाऊस पडला.
२२५ ते २५० पर्यंत : उस्मानाबाद २१४ तर येरमाळा २०९ येथे २०० ते २२५ मिमि पाऊस , भूम २४६ तर वाशी २२९ मिमी. तसेच तुळजापूर २५२, तेरखेडा २९० तर शिराढोण २६१ मिमी इतका पाऊस पडला.
उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीन या पिकांची पेरणी केली असून याची ४११ टक्के पेरणी झाली आहे. भात २८ टक्के, ज्वारी २९ टक्के, बाजरी ४३ टक्के, मका ९३ टक्के, तूर ५७ टक्के, भूईमूग २६ टक्के, मुग ५७ टक्के, तिळ ३१ टक्के, सुर्यफूल १३ टक्के, कारळे ३१ टक्के, कापूस ४०४ टक्के , ऊस ४३ असे एकुण ८९ टक्के विविध पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे.
सव्वालाख
मेट्रीक टन चारा
खरीप हंगाम २०१४ मधुन जिल्ह्यासाठी ४ लाख २५ हजार ८२८ मेट्रीक टन चारा उपलब्ध होणे अपेक्षित आहे. यात उस्मानाबाद तालुक्यातून ६० हजार ६५७ मे टन, तुळजापूर ५९ हजार ५३९, उमरगा ७६ हजार ९१, लोहारा ४४ हजार ३२, भुम ६५ हजार ११३, परंडा ४२ हजार ५०७ मे टन, कळंब ४२ हजार ७८२ तर वाशी तालुक्यातून ३५ हजार ११० असे एकुण ४ लाख २५ हजार ८२८ मेट्रीक टन चारा उपलब्ध होऊ शकतो असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

Web Title: 8 percent of sowing in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.