‘त्या’ प्रकरणात ८ जणांवर गुन्हा
By Admin | Updated: September 27, 2014 23:18 IST2014-09-27T23:12:17+5:302014-09-27T23:18:21+5:30
कनेरगाव नाका : हिंगोली तालुक्यातील कानरखेडा खु. येथे २६ सप्टेंबर रोजी जुने भांडण व पाण्याचा नळ तोडण्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाली.

‘त्या’ प्रकरणात ८ जणांवर गुन्हा
कनेरगाव नाका : हिंगोली तालुक्यातील कानरखेडा खु. येथे २६ सप्टेंबर रोजी जुने भांडण व पाण्याचा नळ तोडण्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाली. या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा गोरेगाव पोलीस ठाण्यात ८ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कानरखेडा खु. येथे सिद्धार्थ प्रल्हाद भगत यास जुन्या वादातून काठ्या, कुऱ्हाडीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्यास हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावरून सिद्धार्थ भगत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मधुकर गणपत इंगोले, श्यामराव मधुकर इंगोले, राहूल भीमराव इंगोले, भीमराव गणपतराव इंगोले, सीताराम इंगोले, ताईबाई इंगोले, सुजाताबाई मधुकर इंगोले, अर्चना श्यामराव इंगोले (सर्व रा. कानरखेडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)