पंचायत समितीचे ८ सभापती बिनविरोध

By Admin | Updated: March 14, 2017 23:52 IST2017-03-14T23:52:12+5:302017-03-14T23:52:51+5:30

लातूर : लातूर जिल्ह्यातील दहाही पंचायत समिती सभापती व उपसभापतींच्या निवडी मंगळवारी झाल्या.

8 Chairmen of Panchayat Samiti unanimous | पंचायत समितीचे ८ सभापती बिनविरोध

पंचायत समितीचे ८ सभापती बिनविरोध

लातूर : लातूर जिल्ह्यातील दहाही पंचायत समिती सभापती व उपसभापतींच्या निवडी मंगळवारी झाल्या. भारतीय जनता पार्टीला निलंगा, रेणापूर, उदगीर, अहमदपूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, चाकूर या ७ पंचायत समितीत बहुमत असल्याने सभापती, उपसभापतींची बिनविरोध निवड झाली. तर काँग्रेसचे जळकोट पंचायत समितीत स्पष्ट बहुमत असल्याने सभापती, उपसभापती बिनविरोध निवडले गेले. औसा आणि लातूरमध्ये स्पष्ट बहुमत नसल्याने निवडणूक घेण्यात आली. या दोन्हीही पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींच्या निवडीत काँग्रेसचा झेंडा फडकला.
निलंगा : निलंगा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीची निवड बिनविरोध झाली. सभापतीपदी अजित माने, तर उपसभापतीपदी ज्ञानेश्वर वाकडे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
निलंगा पंचायत समितीत १८ पैकी १६ सदस्य भाजपाचे आहेत. सभापती पदासाठी भाजपकडून अजित माने, उपसभापती पदासाठी ज्ञानेश्वर वाकडे यांचे नामनिर्देशनपत्र आले. विरोधी पक्षाकडून उमेदवारी अर्ज न आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या दोघांची सभापती व उपसभापती म्हणून बिनविरोध निवड घोषित केली.
नूतन सभापती अजित माने हे मदनसुरी गणातून तर उपसभापती ज्ञानेश्वर वाकडे हे कोकळगाव गणातून निवडून आले आहेत. हे दोन्ही गण औसा मतदारसंघातील आहेत. दोन्ही पदे औशाला मिळाल्याने निलंगा मतदारसंघावर अन्याय झाल्याची कुजबूज कार्यकर्त्यांत होती.

Web Title: 8 Chairmen of Panchayat Samiti unanimous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.