७८ व्या वर्षीही करताहेत जनसेवा
By Admin | Updated: July 1, 2014 01:06 IST2014-07-01T00:44:31+5:302014-07-01T01:06:05+5:30
गंगाराम आढाव , जालना गरिबांच्या सेवेत अहोरात्र झटणारे डॉ. मो. बद्रोद्दीन यांनी जालन्यातील गरीबांचे डॉक्टर म्हणून जालना जिल्ह्यातच नव्हेतर संपूर्ण मराठवाडा व विदर्भातही नावलौकिक केलेले आहे.

७८ व्या वर्षीही करताहेत जनसेवा
गंगाराम आढाव , जालना
गरिबांच्या सेवेत अहोरात्र झटणारे डॉ. मो. बद्रोद्दीन यांनी जालन्यातील गरीबांचे डॉक्टर म्हणून जालना जिल्ह्यातच नव्हेतर संपूर्ण मराठवाडा व विदर्भातही नावलौकिक केलेले आहे.
जुन्या काळातील एम.बी. बी.एस असेलेले डॉ. बद्रोद्दीन अल्पदरात गोर गरीब रूग्णांना गेल्या ५४ वर्षांपासून सेवा देताहेत. ते आज वयाच्या ७८ व्या वर्षीही तरूण डॉक्टरांना लाजवेल, अशी सेवा देतात हे विशेष.
डॉ. बद्रोद्दीन यांचा जन्म १९३६ मध्ये पैठण येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण परभणी येथे झाले. १९६० साली एम.बी.बी.एस.चे शिक्षण उस्मानीया विद्यापीठ हैदराबाद येथे झाले. तेथे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी जालन्यातील मिशन हॉस्पिटल मध्ये १९६० ते १९६४ पर्यंत रूग्णसेवा केली. त्यांनतर त्यांनी जुना जालना भागात स्वत:चा दवाखाना टाकला. त्या काळात बोटावर मोजण्याइतकेच एम.बी.बी.एस डॉक्टर होते. अशा परिस्थितीत त्यांनी जालन्यातील रूग्णांना अत्यंत कमी शुल्क आकारून त्यांची सेवा केली. त्याबरोबरच अनेक गरीब वस्त्यामध्ये मोफत शिबिरे घेऊन सेवा केलेली आता.
त्या काळी आतासारखे वेगवेगळ्या रोगांचे तज्ज्ञ असे वेगवगळे डॉक्टर नव्हते. एकाच डॉक्टराला सर्व रोगांवर निदान करावे लागत. जालना जिल्ह्यातीलच नव्हे, तर मराठवाडा व विदर्भातूनही मोठ्या प्रमाणात सर्व रोगावर उपचार करण्यासाठी रूग्ण त्यांच्याकडे येतात.
आज डॉ. बद्रोद्दीन हे वयाच्या ७८ व्या वर्षी ही जालन्यात सलग ८ ते १० तास दररोज रूग्णांची सेवा करतात.
डॉक्टर डे विशेष...
डॉ. बद्रोद्दीन यांनी जालन्यात गरीब रूग्णाच्या सेवे बरोबरच समाजीक , शैक्षणीक कार्यांत तसेच हिंदू- मुस्लीम एकात्मते साठीही त्यांचे मोठे कार्य आहे. जालन्यात त्यांनी दिवाळी मिलन, ईदमिलन सारखी प्रथा लागू केलेली आहे. ती आजही सुरू असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.