वैजापूरमधील नारंगी धरणात ७६ टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:04 IST2021-09-27T04:04:12+5:302021-09-27T04:04:12+5:30
वैजापूर : तालुक्यात शहर व परिसरात गुरुवारी सायंकाळी सुमारे दोन तास विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. सतत पडत असलेल्या ...

वैजापूरमधील नारंगी धरणात ७६ टक्के जलसाठा
वैजापूर : तालुक्यात शहर व परिसरात गुरुवारी सायंकाळी सुमारे दोन तास विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. सतत पडत असलेल्या पावसामुळे शहरालगतचे नारंगी धरण ७६.०१ टक्के भरले आहे.
तालुक्यात आठ दिवसांपासून पावसाचे जाेरदार आगमन झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे बोर-दहेगाव, कोल्ही, खंडाळा, बिलवणी, जरुळ व मन्याड हे प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. तालुक्यात आतापर्यंत ११२ टक्के पाऊस पडला. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.
वैजापूर तालुक्यात मंडलनिहाय झालेला सरासरी व आतापर्यंत झालेला एकूण पाऊस
मंडलाचे नाव झालेला पाऊस एकूण
वैजापूर ६४ मि.मी. ५९४ मि.मी.
लाडगाव ३५ मि.मी. ४७५ मि.मी.
नागमठाण १५ मि.मी. ३०० मि.मी.
महालगाव २४ मि.मी. ४७८ मि.मी.
लासूरगाव ४१ मि.मी. ८५३ मि.मी.
लोणी ५ मि.मी. ६०५ मि.मी.
शिऊर ६० मि.मी. ७३४ मि.मी.
गारज ४ मि.मी. ७०४ मि.मी.
बोरसर ४२ मि.मी. ७०३ मि.मी.
खंडाळा २६ मि.मी. ६३८ मि.मी.
.....................................................................
एकूण ३१६ मि.मी. ६१६.४ मि.मी
260921\img-20210926-wa0325.jpg
फोटो