शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

७६ लाखांची फसवणूक प्रकरणात अकील अब्बास पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 16:40 IST

व्यवसायात भागीदारी आणि नफा देण्याचे आमिष

ठळक मुद्दे २२ जून रोजी पोलीस आयुक्तांकडे अकीलविरोधात अर्ज

औरंगाबाद :  व्यवसायात २० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून ओळखीच्या महिलेची तब्बल ७६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने क्रांतीचौक येथील पेट्रोलपंपाचे मालक अकील फजल अब्बासला (रा. पाणचक्की परिसर)  ताब्यात घेतले. 

विटखेडा येथील रागिणी जयेश पटेल आणि आरोपी अकील यांचे अनेक वर्षांपासून घरगुती संबंध आहेत. सप्टेंबर २०१५ मध्ये अकील हे रागिणी यांच्या घरी गेले. आपण कचऱ्याच्या गाड्यांचा पुरवठा करण्याचा व्यवसाय करीत असून त्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याचे त्याने सांगितले. या व्यवसायात पैसे गुंतविल्यास २० टक्के नफा देण्याचे आमिष त्याने दाखविले. यावेळी रागिनी यांनी पैशांवरून संबंध बिघडतात, त्यामुळे मी तुमच्या व्यवसायात पैसे गुंतविणार नाही, असे स्पष्ट  बजावले. यानंतरही अकीलने पैशाची आवश्यकता असल्याचे सांगून कमीत कमी ५१ लाख रुपये गुंतवा, मी तुम्हाला २० टक्के नफा देतो, असे सांगितले. अकीलवर विश्वास ठेवून रागिनी यांनी त्याला २६ लाख, १४ लाख आणि ११ लाख रुपयांचे तीन वेगवेगळे धनादेश दिले. हे धनादेश आरोपीने वटवून घेतले. यानंतर १९ जुलै २०१६ पर्यंत अकीलने रागिणी यांना मुद्दल रक्कम म्हणून चार लाख रुपये परत केले.

यानंतर रागिणी या त्याच्याकडे व्यवसायाचा हिशेब मागत होत्या; परंतु वेगवेगळी कारणे सांगून त्यांनी वेळ मारून नेली.  अकीलने आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच रागिणी यांनी २२ जून रोजी पोलीस आयुक्तांकडे अकीलविरोधात अर्ज दिला. याबाबत माहिती मिळताच अकीलने रागिणी यांना पन्नास हजार रुपये दिले. 

सिटीचौक ठाण्यात गुन्हा४५० हजार रुपये दिल्यानंतर उर्वरित मुद्दल ४६ लाख ५० हजार रुपये आणि २० टक्के भागीदारीनुसार ३० लाख, अशी एकूण ७६ लाख ५० हजार रुपयांची मागणी महिलेने केली असता अकीलने त्यांना पैशासाठी भेटायचेही नाही, असे धमकावले. अकीलने विश्वासघात केल्याचे लक्षात येताच रागिनी यांनी सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसArrestअटक